केंद्राचा कॉंग्रेसला आणखी एक धक्का ,25 जून "संविधान हत्या दिवस" पाळणार
नवी दिल्ली : कॉंग्रेसला खिजवण्याची एकही संधी भाजपने आतापर्यंत सोडलेली नाही. सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळून भाजपला आता अवघा एक महिना होत आला आहे. लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात देखील भाजपने कॉंग्रेसला विविध विषयांवरून चांगलेच अडचणीत आणले. आतादेखील आणखी एक निर्णय घेऊन भाजप सरकारने कॉंग्रेसला चांगलाच धक्का दिलाय.

"संविधान खतरे मे है" चा नारा देऊन राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत हवा चांगलीच तापवली होती. हातात संविधानाची प्रत घेतलेल्या राहुल गांधी आणि ईंडी आघाडीला त्यामुळे चांगलेच यश मिळाले होते. संविधानाच्या मुद्यामुळे आपले नुकसान होतेय हे लक्षात येण्यात भाजपला उशीर झाला. त्यानंतर भाजपने हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत चांगलाच उशीर झाला होता. आणि कॉंग्रेस पुढे निघून गेली होती. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनी सावरल्यामुळे भाजप तरला. यापुढेही संविधानाचा हाच अजेंडा चालवण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न होता. मात्र केंद्रातील सत्ताधारी भाजप आघाडीने त्या प्रयत्नांना खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय.
On June 25, 1975, the then PM Indira Gandhi, in a brazen display of a dictatorial mindset, strangled the soul of our democracy by imposing the Emergency on the nation. Lakhs of people were thrown behind bars for no fault of their own, and the voice of the media was silenced.
— Amit Shah (@AmitShah) July 12, 2024
The… pic.twitter.com/9sEfPGjG2S
25 जून रोजी साजरा करणार "हा" दिवस
केंद्राने प्रतिवर्षी 25 जून हा दिवस "संविधान हत्या दिवस" म्हणून घोषित केलाय. त्या संबंधीची अधिसूचना देखील काढण्यात आलीय. 25 जून 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी "आणीबाणी"ची घोषणा करून जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणली होती. आपल्या विरोधातील हजारो नेत्यांना काहीही कारण न देता तुरुंगात डांबले होते. आता ईंडी आघाडीत असलेल्या अनेक पक्षांच्या नेत्यांचा त्यात समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील कारागृहात होते. त्या काळात अनेक संघटनांवर बंदी घालण्यात आली होती. तसेच आणीबाणीला अनुशासनपर्व असे गोड नाव देऊन अनेक अप्रिय निर्णय घेण्यात आले होते. वृत्तपत्र आणि भाषण स्वातंत्र्यावर बंदी आणली होती. आणीबाणीच्या कठोर काळात यातना भोगणाऱ्या आणि कारावास सहन करणाऱ्या भारतीयांचे दरवर्षी 25 जून रोजी स्मरण केले जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित केलंय. मात्र आता "संविधान हत्या दिवस"ची घोषणा करून भाजप सरकारने कॉंग्रेसला आपला हुकुमशाहीचा इतिहास दरवर्षी दाखवून देणारा आरसाच दिलाय.
ममता बनर्जी यांची टीका
हा निर्णय विरोधकांना चांगलाच झोंबला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आज मुंबईत होत्या. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्राच्या या निर्णयावर टीका केली. चर्चा न करताच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. मोदींच्या राज्यात हुकुमशाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्राच्या विरोधात उद्धव ठाकरे हे आक्रमकपणे लढलेत. त्यांची हिम्मत कौतुकास्पद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.












Click it and Unblock the Notifications