महाकुंभाने UP ला केले मालामाल; राज्याची तिजोरी भरली, CM योगींनी सांगितले राज्याने किती कमावले?
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्यावर योगी सरकारने अनेक कोटी रुपये खर्च केले आहेत. महाकुंभाच्या आयोजनाबाबत विरोधी पक्ष सरकारवर कायम प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकार महाकुंभाचे ब्रँडिंग करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठा दावा केला आहे. महाकुंभात आत्तापर्यंत ५० ते ५५ कोटी भाविकांना प्रयागराजला भेट दिली. त्यातून युपी सरकारला तीन लाख कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले योगी?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज लखनऊ उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी म्हणाले, 'अटलजींच्या स्वप्नातील लखनऊ तयार केल्याबद्दल मी राजनाथ सिंह जी यांचे स्वागत करतो. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेही युपी वासियांच्यावतीने स्वागत करतो. आज १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी झाली. नवीन भारताचा एक नवीन उत्तर प्रदेश तयार होत आहे.

५० कोटी भाविकांचे स्नान
मुख्यमंत्री योगी म्हणाले, 'एका महिन्यात ५० कोटी भाविकांनी प्रयागराज महाकुंभात स्नान केले. महाकुंभातून ५० कोटी भाविकांनी एक भारत श्रेष्ठ भारताचा संदेश घेतला. एयरो सिटीसह लखनऊ आता एआय शहर म्हणून विकसित होत आहे. कुंभमेळास्थळ देखील संरक्षण दलाच्या जमिनीवर आयोजित केले जात आहे. गेल्या ८ वर्षांपासून संरक्षण विभागाची जमीन अगदी सहज उपलब्ध होत आहे.
गडकरींचे केले अभिनंदन
सीएम योगी म्हणाले, 'बहुतेक भाविक रस्त्याने प्रयागराजला आले होते. रेल्वे आणि विमानतळांवरही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. चांगल्या रस्ते वाहतुकीचे श्रेय नितीन गडकरीजींना जाते. हे काम फक्त डबल इंजिन सरकारमध्येच शक्य आहे. देशातील ११० कोटी हिंदूंपैकी ५० कोटी हिंदूंनी महाकुंभात स्नान केले. महाकुंभाशी संबंधित प्रत्येक प्रस्तावाला गडकरीजींनी मान्यता दिली. या प्रसंगी मी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत करतो. आमच्या मंत्रिमंडळाने २२ तारखेला महाकुंभातही स्नान केले.
युपीने किती रुपये कमविले?
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, ५०-५५ कोटी भाविकांच्या आगमनामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला ३ लाख कोटी रुपयांचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. महाकुंभाच्या नावाखाली देण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे केवळ महाकुंभाचे सौंदर्यीकरण झाले नाही, तर प्रयागराजचेही सौंदर्यीकरण झाले. १५ हजार कोटी रुपयांच्या खर्चातून ३ लाख कोटी रुपयांचा नफा आमच्या राज्याने कमवला, असे योगीजींनी स्पष्ट केले.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications