एअर इंडियाच्या अपघातानंतर 22 बोईंग-787 विमानांची चेकिंग पूर्ण; जाणून घ्या रिपोर्ट काय सांगतोय?
Air India Plane Crash Update News : अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे विमान विमानतळापासून काही अंतरावरच कोसळले. 12 जून 2025 रोजी झालेल्या अपघातात 241 प्रवाशांसह 270 लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचे हे विमान बोईंग 787 ड्रीमलायनर होते. दरम्यान, या अपघातानंतर, एअर इंडियाने त्यांच्याकडे असलेल्या 33 बोईंग 787 विमानांपैकी 22 विमानांची सखोल चेकिंग पूर्ण केली आहे. त्या चेकिंगचा अहवाल समोर आला आहे. त्यात नेमकं काय म्हटलं, याविषयी आज जाणून घेणार आहोत.
एअर इंडियाकडे एकूण 33 ड्रीमलायनर विमाने आहेत, त्यापैकी पहिले विमान 2012 मध्ये समाविष्ट होते. तर दुसरीकडे अहमदाबाद या ठिकाणी झालेले अपघातग्रस्त विमान AI171 हे 2014 पासून कंपनीने प्रवाशांच्या सेवेत दिलेले होते. ही तपासणी DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) ने केली होती, ज्या अंतर्गत GEnx इंजिन असलेल्या विमानांचे टेकऑफ पॅरामीटर्स, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण प्रणाली आणि इंजिन इंधन प्रणालीची सखोल तपासणी करण्यात आली आहे.

बोईंग-787 विमानाच्या तपासणीत काय बाहेर आले?
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले आहे की, आतापर्यंतच्या तपासात कोणताही मोठा तांत्रिक दोष आढळलेला नाही. आतापर्यंत कोणत्याही विमानात कोणताही चिंतानजक दोष आढळून आलेला नाही.
हिंदुस्तान टाईम्सने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, एका अधिकाऱ्याने सांगितले की, "22 ड्रीमलाइनर विमानांची तपासणी पूर्ण झाली आहे आणि त्यामध्ये काहीही धोकादायक किंवा भयानक आढळले नाही. उर्वरित बोईंग 787 विमानांची तपासणी देखील आज, 16 जून रात्री उशीरापर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर त्याचा देखील अहवाल समोर येईल.
चेकिंगच्या निर्णयामुळे अनेक उड्डाणे करावी लागली रद्द!
डीजीसीएच्या वतीने सुरु असलेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या तपासणीमुळे, सिडनी आणि मेलबर्नला जाणाऱ्या उड्डाणांसह अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याच्या मते, "ही उड्डाणे रद्द करण्याची दोन मुख्य कारणे होती - एक, सविस्तर चौकशीला खूप वेळ लागेल आणि दुसरे, इराणी हवाई क्षेत्र बंद केले गेले आहेत.
एअर इंडिया विमान अपघात : 275 जणांचा मृत्यू
12 जून रोजी, लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. या अपघातात विमान थेट डॉक्टरांच्या वसतिगृहावर आदळले. या दुर्दैवी अपघातात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. फक्त एकच व्यक्ती बचावली.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 275 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, या अपघातात जवळपासचे रहिवासी आणि एमबीबीएस विद्यार्थ्यांसह 34 जणांचा मृत्यू झाला.
मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. गुजरात सरकारचे मदत आयुक्त आलोक कुमार पांडे म्हणाले, "एकूण मृतांची संख्या शोधण्यासाठी वेळ लागेल." आतापर्यंत डीएनए चाचणीद्वारे ८७ मृतांची ओळख पटवण्यात आली आहे आणि ४७ मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत.
बोईंग टीम तपासासाठी पोहोचली
ताज्या माहितीनुसार, बोईंग कंपनी आणि एएआयबीचे अधिकारी सोमवार 16 जून रोजी अहमदाबादला पोहोचले आहेत. अपघाताची कारणे शोधण्यासाठी ते अपघातस्थळाची चौकशी करत आहेत. नेमकं काय घडलं, कसं घडलं, अपघात नेमका कसा घडला, यासह अनेक गोष्टींचा शोध या तपासात घेतला जात आहे.












Click it and Unblock the Notifications