Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बुरखाधारी महिला रस्त्यावरील पाकिस्तानी झेंडे उचलताना दिसल्या! Video व्हायरल, लोकांचा संताप!

Burqa-clad woman seen raising Pakistani flags on the road : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतात पाकिस्तानचा कडाडून विरोध होत आहे, भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे आणि लोक रस्त्यावर येत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटकातील काही लोकांनी रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे चिकटवले होते, यानंतर दोन मुस्लिम महिला त्या उचलताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे लोकांचा सोशल मीडियावर संताप समोर आला आहे.

Burqa-clad woman seen raising Pakistani flags

भारतात टीआरएफ आणि लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांची निर्घुन हत्या केली आणि हा हल्ला घडवून आणला. याला पाकिस्तानची छुपी मदत असल्याचे समोर येत आहे. अशा स्थितीत भारताने पाकिस्तानविरोधी उघड भूमिका घेत सिंधु जलकरार रद्द करण्याची घोषणा केली. यासह पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्याचे फर्मान काढले. ही समाधानकारक बाब लोकांमध्ये आहे.

लोकांनी रस्त्यावर येत आपल्या भावना व्यक्त केल्या.सुमारे सव्वीस ते सत्तावीस लोकांचा जीव घेणाऱ्या हल्ल्यानंतर कर्नाटकातील काही लोकांनी रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे चिकटवले होते आणि पाकिस्तानचा विरोध केला होता. यानंतर बुरखा घातलेल्या दोन महिला हे रस्त्यावर चिटकवलेले झेंडे उठवताना दिसत आहेत.

Take a Poll

काय आहे व्हायरल व्हिडिओ?

रस्त्यावर दुभाजकानजीक काहींनी पाकिस्तानी झेंडे चिटकवले होते त्यात दोन बुरखाधारी महिला हे झेंडे उचलताना दिसत आहेत. यासह त्या चवताळून काहीतरी पुटपुटतानाचा व्हिडिओ दिसतोय.

सोशल मीडियावर लोक संतप्त

एकीकडे पाकिस्तानविरोधी रोष असताना आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर व्हिडिओवर कमेंट पडत आहेत. लोकांच्या संतप्त भावना असून या महिलांच्या या कृतीबद्दल लोकांनी ट्रोल केले आहे. एका युजर्सने म्हटले की, "अहो स्टिकर्स चिकटवत राहा, तिला बाहेर येऊ द्या, बघू किती आणि कुठून बाहेर येईल, हे पाकिस्तानी जे भारतात राहतात ते देशद्रोही आहे." दुसरा युजर्स म्हणतो की,"देशाबाहेर लढण्यापेक्षा आधी देशातील शत्रू दूर करा."

तिसरा युजर्स लिहितो की, "मला वाटते की ते पाकिस्तान किंवा त्यांच्या ध्वजाचे रक्षण करत नाहीत. इस्लाममधील चंद्रकोर चंद्र आणि तारा हिंदू धर्मातील 'ॐ' सारखा आहे. माझ्या मते ते त्यांच्या धार्मिक श्रद्धांचे रक्षण करत आहेत."

तर चौथा युजर्स म्हणतो की, "आपली सर्वात मोठी चूक ही आहे की आपण खूप धर्मनिरपेक्ष झालो आणि जागृत झालो आणि हीच गोष्ट आपल्या देशाला आतून नष्ट करत आहे"

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+