अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय? किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्यासोबत १० महत्त्वाच्या घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. त्यांनी आज कृषी क्षेत्रासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर केली आहे. तसेच पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, त्याचबरोबर फळ आणि भाजी उत्पादकांसाठी देखील विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. कृषी क्षेत्रासाठी केलेल्या महत्वाच्या 10 घोषणांची माहिती आपण पाहू...

Budget 2025

शेतकऱ्यांसाठी 10 महत्वाच्या घोषणा

1) किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली. ती 3 लाखांवरुन थेट 5 लाख करण्यात आली.
2) ईशान्य भारतात युरिया निर्मीतीचे तीन कारखाने होणार आहेत. त्यांची मर्यादा 12.7 लाख मेट्रिक टन असेल.
3) पंतप्रधान धन- धान्य कृषी योजना राबविली जाईल. राज्यांचाही त्यात सहभाग असेल. यामध्ये 100 जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात येईल. 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
4) डाळींसाठी 6 वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजना लागू करण्यात येईल.
5) फळ भाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येईल.
6) बिहारमध्ये मकाना बोर्डची स्थापना होईल.
7) अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येईल.
8) कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर करण्यात आले. कापसाच्या विविध जाती विकसित करण्याची घोषणाही सीतारामन यांनी केली.
9) कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल.
10) निर्यात करणाऱ्या एमएसएमईला 20 कोटींपर्यंतचे मुदत कर्ज देण्याची घोषणाही करण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+