Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नितीश कुमार यांचा मुलगा निशांत येणार राजकारणात? 'या' मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये होणार आहेत. त्यामुळे बिहारचे राजकारण सध्या चांगलेच चर्चेत येऊ लागले आहे. बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुलगा निशांत याची चर्चा वाढली आहे. निशांतच्या सध्याच्या हालचाल पाहता तो लवकरच राजकारणात प्रवेश करेल, असे सांगितले जात आहे. नालंदा जिल्ह्यातील हरनौत विधानसभा मतदारसंघातून तो निवडणूक लढवेल, असा काहींचा अंदाज आहे.

Nishant Kumar s entry into politics

निशांत राजकारणात करणार प्रवेश

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आत्तापर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांना बिहारच्या राजकारणातून दूर ठेवले होते. मात्र आता कुटुंबाच्या दबावामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा निशांत हा राजकारणात एन्ट्री करेल, असे सांगितले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत निशांत हा नालंदाच्या हरनौत विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार असू शकतात. हरनौत विधानसभेची जागा ही जेडीयूचा अभेद्य किल्ला मानली जाते. नितीश कुमार यांनीही येथूनच आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. सध्या जेडीयूचे हरिनारायण सिंह हे हरनौत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. हरिनारायण सलग तिसऱ्यांदा येथून आमदार झाले आहेत.

निशांत राजकारणात झाला सक्रीय

नितीश यांचा मुलगा निशांत सध्या बिहारच्या राजकारणात चांगलाच सक्रीय झाला आहे. अलिकडच्या त्याच्या विधानांमुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेला बळकटी मिळाली आहे. निशांतने आपल्या वडिलांच्या प्रकृतीसह जेडीयूसाठी अधिक जागा मिळाव्यात अशी विनंती केली आहे. निशांत अलीकडेच म्हणाला होता की, वडिलांनी विकास केला आहे. मागच्या वेळी तुम्ही लोकांनी त्यांना ४३ जागा दिल्या होत्या. तरीही त्यांनी विकासाचे काम सुरू ठेवले. यावेळी जागा वाढवा जेणेकरून वडील विकासाचे काम पुढे चालू ठेवू शकतील. निशांत कुमार यांनी भाजपच्या रणनीतीकारांना त्यांच्या वडिलांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.

निशांत जेडीयूचा उत्तराधिकारी बनणार

नितिश कुमार यांच्यानंतर जेडीयूचा उत्तराधिकारी म्हणून निशांतकडे पाहिले जात आहे. वडिलांची इच्छा नसली तरी, त्यांच्या कुटुंबातून मात्र निशांतनेच जेडीयूचा उत्तराधिकारी व्हावे, असे अनेकदा बोलून दाखवले आहे. राष्ट्रीय जनता दल आणि लोक जनशक्ती पक्षात जसे घडले तसेच जेडीयूही घडावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राजदमध्ये लालू यादव यांची प्रकृती बिघडली तेव्हा तेजस्वी यादव यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. दुसरीकडे, लोजपामध्ये रामविलास पासवान यांच्यानंतर चिराग यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. यामुळे पक्षप्रमुख आजारी असतानाही पक्षाचे विघटन होण्यापासून संरक्षण झाले.

नितीश यांचा निर्णय असेल अंतिम

निशांत हे राजकारणात येणार की नाही, हे सर्वस्वी नितिश कुमार यांच्यावरच अलवंबून असणार आहे. निशांत यांच्या राजकीय कारकि‍र्दीबद्दल मंत्री विजय चौधरी यांनी गुरुवारी समस्तीपूरमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, कोणीही याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. नितीश कुमार यांनी जनता दल युनायटेड पार्टीची स्थापना केली आहे. ते पक्षाचे एकमताने स्वीकृत नेते आहेत. पक्षाचे पुढे काय करायचे ते नितीश ठरवतील. त्याचा निर्णय अंतिम असेल."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+