बिहारमध्ये 'या' एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज! नितीशकुमार, भाजप नव्हे, 'हा' पक्ष सर्वात मोठा ठरणार
Bihar Exit Poll 2025 Axis My India Predicts : बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलने (Exit Poll) राज्यातील राजकीय गणिते बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 'ॲक्सिस माय इंडिया'ने जाहीर केलेल्या सर्व्हेनुसार, राष्ट्रीय लोक दल म्हणजेच आरजेडी बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे, तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA आघाडी मात्र बहुमताचा आकडा सहज पार करेल असा अंदाज आहे. भाजपला मात्र या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोल: मुख्य आकडे
NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी): जागांचा अंदाज: 121 ते 141, मतांचा टक्का (Vote Share): 43%
महागठबंधन (MGB): जागांचा अंदाज: 98 ते 118, मतांचा टक्का (Vote Share): 41%
प्रमुख पक्षांचा कामगिरी अंदाज
- RJD (राष्ट्रीय जनता दल): जागांचा अंदाज: 67 ते 76, मतांचा टक्का : 24%
- JDU (जनता दल युनायटेड): जागांचा अंदाज: 56 ते 62, मतांचा टक्का : 18%
- BJP (भारतीय जनता पक्ष): जागांचा अंदाज : 50 ते 56, मतांचा टक्का : 18%
- काँग्रेस (CONG): जागांचा अंदाज: 17 ते 21, मतांचा टक्का (Vote Share): 10%
- LJP (लोक जनशक्ती पार्टी): जागांचा अंदाज: 11 ते 16, मतांचा टक्का (Vote Share): 5%
तेजस्वी यादव यांचा 'खेळ' यशस्वी!
'ॲक्सिस माय इंडिया'च्या आकडेवारीनुसार, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील RJD (राष्ट्रीय जनता दल) 67 ते 76 जागांसह बिहारमधील सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. पक्ष लढलेल्या 143 जागांच्या तुलनेत हा आकडा त्यांच्यासाठी मोठी 'बल्ले-बल्ले' आहे.
RJD: सर्वात मोठा पक्ष
जेडीयू (JDU): 56-62 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर
भाजप (BJP) : 50-56 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर (सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता)
भाजप आणि JDU चा मतांचा टक्का 18-18% असला तरी, भाजपला जागांच्या बाबतीत मोठी घट दिसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजपला सर्वात जास्त नुकसान होताना दिसत आहे.
NDA बहुमताच्या दिशेने...
पक्षीय पातळीवर RJD सर्वात मोठा पक्ष ठरत असला तरी, एनडीए (NDA) आघाडी मात्र 121 ते 141 जागा मिळवून बहुमताचा (122 जागा) आकडा पार करेल असा अंदाज आहे. महागठबंधनला 98 ते 118 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मतांच्या टक्केवारीत देखील NDA (43%) महागठबंधनच्या (41%) तुलनेत 2% मतांनी पुढे आहे.
प्रशांत किशोर यांच्या 'जनसुराज'ला झटका
निवडणुकीत जोरदार मोहीम राबवणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला एक्झिट पोलमध्ये मोठा झटका बसल्याचे दिसत आहे. 'ॲक्सिस माय इंडिया'ने जन सुराजला केवळ 4% मते मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे पक्ष केवळ काहीच जागांवर चुरशीची लढत देऊ शकला आहे. प्रशांत किशोर यांची मेहनत अपेक्षेप्रमाणे मतदारांमध्ये परिवर्तन घडवू शकली नाही, हे या आकडेवारीतून स्पष्ट होते.












Click it and Unblock the Notifications