Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बिहारच्या 83 जागांवर प्रशांत किशोर कोणाचा खेळ बिघडवणार? एनडीए की महाआघाडी?, धक्कादायक सर्वे

Prashant Kishor Jan Suraaj May Upset NDA and Mahagathbandhan : बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तथापि, दुसरीकडे महाआघाडीमध्ये अजूनही अनिश्चितता कायम आहे. याच दरम्यान, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (PK) यांच्या 'जन सुराज' पक्षानेही आपले ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात आपले आव्हान उभे केले आहे.

जन सुराजचा हा प्रवेश बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, 'व्होट व्हायब' या संस्थेने केलेले एक सर्वेक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक आकडेवारी समोर आणते.

या सर्वेक्षणानुसार, प्रशांत किशोर हे बिहारमधील 243 पैकी तब्बल 83 जागांवर महाआघाडी आणि एनडीए या दोन्ही प्रमुख आघाड्यांसाठी 'गेम चेंजर' नव्हे, तर 'गेम स्पॉइलर' अर्थात गेम बिघडवणारे ठरण्याची शक्यता वर्तविली आहे.

bihar election 2025

मतांची टक्केवारी: त्रिकोणी लढत नाही, पण परिणाम निश्चित

व्होट व्हायबचे संस्थापक अमिताभ तिवारी यांच्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या सर्वेक्षणात 'जन सुराज'ला मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढली होती, परंतु आता ती पुन्हा 9 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. याउलट, महाआघाडी आणि एनडीएच्या मतांची टक्केवारी वाढलेली दिसत आहे.

या आकडेवारीच्या आधारावर, तिवारी यांचे मत आहे की, प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या रिंगणात उतरण्याने ही निवडणूक त्रिकोणी झाली आहे असे म्हणता येणार नाही. कारण, त्रिकोणी लढत तेव्हाच होऊ शकते जेव्हा तिसरा पक्ष 15-20 टक्के मते मिळवण्यात यशस्वी होतो. किमान मतांच्या बाबतीत तरी 'जन सुराज' त्या पातळीवर पोहोचलेला नाही. तथापि, 9 टक्के मतांचा वाटा देखील निवडणुकीचा निकाल फिरवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.

पीके कोणाची मते कमी करतील?

प्रशांत किशोर यांचा पक्ष नेमक्या कोणत्या पक्षाच्या मतांवर गदा आणेल? यावर देखील या सर्व्हेक्षणातून खुलासा करण्यात आलेला आहे.

अपक्ष आणि लहान पक्ष

पीके सध्या अपक्ष आणि लहान पक्षांकडून मते मिळवत आहेत. कारण, हे मतदार एनडीए आणि महाआघाडीविरोधी आहेत आणि त्यांना आता 'जन सुराज'च्या रूपात एक पर्यायी चेहरा दिसत आहे. बिहारमध्ये अपक्षांचा मतदानाचा वाटा साधारणपणे ८-१० टक्के इतका असतो आणि पीके यांची नजर या मतदारांवर आहे.

महाआघाडीला नुकसान

'जन सुराज'चा दुसरा फटका महाआघाडीला बसण्याची शक्यता आहे. तिवारी यांच्या विश्लेषणानुसार, पीके सतत शिक्षणाबद्दल बोलून तेजस्वी यादव यांच्या 'ब्रँड स्टेटस'चे एक प्रकारे नुकसान करत आहेत, ज्यामुळे महाआघाडीचे काही मतदार त्यांच्याकडे वळू शकतात.

एनडीए/भाजपला नुकसान

तिसऱ्या बाजूला, प्रशांत किशोर भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून भाजप किंवा एनडीएलाही नुकसान पोहोचवू शकतात.

83 जागा जिथे विजयी फरक 5 टक्क्यांपेक्षा कमी

सर्वेक्षणातून समोर आलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, ज्या 83 जागांवर प्रशांत किशोर निवडणूक लढवत आहेत, तिथे विजयी मतांचा फरक 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

याचाच अर्थ, जर 'जन सुराज'ला या जागांवर ५ टक्क्यांपर्यंत मतांचा वाटा मिळाला, तर तो थेट एका पक्षाच्या किंवा दुसऱ्या पक्षाच्या विजयाचा खेळ बिघडवेल.

नितीश कुमार यांच्या जेडीयूला लक्ष्य?

प्रशांत किशोर यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे की, "जेडीयू (JDU) २५ जागा जिंकणार नाही आणि नितीश कुमार (Nitish Kumar) मुख्यमंत्री होणार नाहीत." या वक्तव्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो की, पीके यांचे मुख्य लक्ष फक्त नितीश कुमार यांच्या पक्षाला नुकसान पोहोचवण्यावर असेल का?

अमिताभ तिवारी यांनी याकडे लक्ष वेधले आहे की, "गेल्या वेळी चिराग पासवान यांनी जसे फक्त जेडीयूविरुद्ध उमेदवार उभे केले होते, तसेच पीके फक्त जेडीयूच्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करतात का, हे पाहावे लागेल.

हे घटक ठरणार परिणाम करणारे!

पीके नेमक्या कोणत्या 83 जागांवर नुकसान करेल, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, परंतु जन सुराजच्या उमेदवारांची नावे, त्यांची जात, शिक्षण आणि त्यांचा मागील निवडणुकीचा अनुभव यासारखे घटक निर्णायक ठरतील.

एकंदरीत, प्रशांत किशोर यांची 'जन सुराज' पक्ष थेट निवडणुकीच्या निकालावर निर्णायक प्रभाव पाडेल, अशी शक्यता सध्या दिसत नसली तरी, केवळ 9 टक्के मतांच्या वाटा घेऊनही ते 83 महत्त्वाच्या जागांवर एनडीए आणि महाआघाडी या दोघांचेही 'विजयी गणित' बिघडवण्याची क्षमता निश्चितच ठेवतात. यामुळे बिहारची आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनिश्चिततेने भरलेली असेल यात शंका नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+