Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्रियंका गांधींच्या हॅण्डबॅगवर पॅलेस्टाईननंतर आज बांगलादेशाचा मुद्दा; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

Bangladesh issue on Priyanka Gandhi handbag : वायनाड लोकसभेच्या खासदार प्रियांका गांधी मंगळवारी संसदेत एक पिशवी घेऊन पोहोचल्या ज्यावर बांगलादेशी हिंदू आणि ख्रिश्चन एकत्र उभे आहेत असे लिहिले होते. तर एका दिवसांपूर्वी त्यांच्या बॅगवर पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारा मुद्दा त्यांच्या बॅगवर लिहिलेला होता. ज्यावर पॅलेस्टाईन मुक्त होईल असे लिहिले होते. त्यावरून सभागृहात व सभागृहाच्या बाहेर चर्चा देखील रंगली होती. चला तर जाणून घेऊया, प्रियांका गांधी व कॉंग्रेसची नेमकी मागणी काय आहे. त्यांच्या या पेहरावाचा व्हिडिओ व फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

मी कसा पेहराव करायचा हे कोणी ठरवू शकत नाही

प्रियांका यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सांगितले होते - मी कसा पेहराव करणार हे दुसरे कोणीही ठरवणार नाही, वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढीवादी पितृसत्तेवर माझा विश्वास नाही, मला पाहिजे ते परिधान करेन, असे म्हणत त्यांनी सत्तापक्षातील टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

Bangladesh issue on Priyanka Gandhi handbag

बांगलादेशातील हिंदू अन् ख्रिश्चन अल्पसंख्यांकांना वाचविण्याची गरज

प्रियांका गांधी यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासातही प्रश्न विचारला होता. त्या म्हणाल्या होत्या की, मला ज्या पहिल्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे ती म्हणजे या सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे, त्यांच्याशी बोलून त्यांचा पाठिंबा मिळवावा. दुसरा मुद्दा म्हणजे आज लष्कराच्या मुख्यालयातून एक छायाचित्र काढण्यात आले आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराला शरण येत आहे. आज विजय दिवस आहे. सर्वप्रथम मला 1971 च्या युद्धात आपल्यासाठी लढलेल्या शूर जवानांना सलाम करावासा वाटतो.

प्रियांका म्हणाल्या की, बांगलादेशात जे काही घडत होते, बांगलादेशातील लोकांचा, आमच्या बंगाली बांधवांचा आवाज कोणीही ऐकत नाही. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, मला त्यांना सलाम करावासा वाटतो. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी धैर्य दाखवले आणि देशाला विजयाकडे नेणारे नेतृत्व दाखवले.

Bangladesh issue on Priyanka Gandhi handbag

बांगलादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंदूंवरील धार्मिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 'सेंटर फॉर डेमोक्रसी, प्लुरॅलिझम अँड ह्युमन राइट्स' च्या अहवालानुसार, बांगलादेशमध्ये 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान हिंदूंच्या लुटीच्या 190 घटना घडल्या.

32 घरांना जाळपोळ, 16 मंदिरांची तोडफोड आणि 2 लैंगिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल आहेत. अहवालानुसार, 20 ऑगस्टपर्यंत हिंदूंविरुद्ध हिंसाचाराची एकूण 2010 प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये हिंदू कुटुंबांवरील हल्ल्याच्या 157 आणि मंदिरांच्या विटंबनेच्या 69 प्रकरणांचा समावेश आहे. युनूस सरकारने इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण दास यांना 25 नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. चिन्मय प्रभूच्या अटकेनंतर चितगावमध्ये हिंसाचार पसरला होता. या हिंसाचारात एका वकिलाचाही मृत्यू झाला.

पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी केले प्रियंका गांधींचे कौतुक

पाकिस्तान सरकारमधील माजी मंत्री फवाद हसन चौधरी यांनीही पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि आमच्या खासदारांमध्ये तेवढी हिंमत नाही, असे सांगितले. पाकिस्तानच्या इम्रान सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या फवाद हसन चौधरी यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्याबद्दल प्रियांका गांधी यांचे कौतुक केलेले आहे.

त्यांनी सोशल मीडियावर लिहिले- जवाहरलाल नेहरूंसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नातवाकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? प्रियांका यांनी आपली प्रतीमा अधीक उंचावली आहे. आजपर्यंत एकाही पाकिस्तानी खासदाराने असे धाडस दाखवले नाही हे लज्जास्पद आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+