Atul Subhash Tragedy :का वाढत आहेत घटस्फोट, ती कोणती गोष्ट, ज्यामुळे पती-पत्नीत होत आहेत भांडणं वाचा
Atul Subhash Tragedy Why divorces are increasing : भारताची ओळख सुसंस्कृत देश अशी आहे. भारतीय संस्कृतीत अनेक चालीरितींना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यातलाच एक संस्कार म्हणजे लग्न. लग्नाला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. लग्नाला भारतात पवित्र व धार्मिक काय मानले गेले आहे. त्यामुळेच आपल्याकडे लग्न फक्त दोन व्यक्तींचे एकत्र येणे नसून एका सोहळा असतो.
पूर्वी लग्न म्हणजे एका प्रकारचा विश्वास होता, पण आज याच लग्नातल्या गाठी तुटत आहे. एके काळी जिथे 40-50 वर्षांचा सुखाचा संसार चालायचा, तोच आज एक दोन वर्षात मोडला जाऊ लागला आहे. लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये मतभेद होणे आणि नंतर प्रकरण कोर्टात जाणे हे आजकाल जणू सामान्यच बाब झालेली पाहायला मिळत आहे. आजही जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे. आजही भारतात अनेक लोक लग्नाला साता जन्माचे नाते मानतात. भारतात घटस्फोटाचे प्रमाण अंदाजे 1.1% आहे, जे संपूर्ण जगात सर्वात कमी आहे.
घटस्फोट होण्यामागची सामान्य कारणं कोणती आहेत जाणून घेणे महत्वाचे आहे.

तर कौटुंबिक वादाला कंटाळून अनेक जण आयुष्य संपविल्याच्या घटना देखील समाजात घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक व मन हेलावून लावणारी घटना बंगळुरूत घडली. अतुल सुभाष नावाच्या इंजिनिअरने पत्नी व सासरच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने देश हळहळला तर अतुलने सुसाईट नोटमध्ये केलेल्या कायद्याच्या त्रुटींवरही बोट ठेवले.
आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की, मोठ्या विश्वासाने बांधलेली लग्नगाठ काही दिवसांत काही वर्षांतच का सैल होऊ लागली आहे. भारतात दिवसेंदिवस घटस्फोटाच्या घटना का घडत आहेत. जाणून घ्या त्यामागील कारणं.
भांडणं आणि घटस्फोटाची सामान्य कारणं
भारतासह जगभरातील अभ्यासकांनुसार, समाजात वाढणाऱ्या घटस्फोटाच्या प्रकरणांची अनेक कारणं आहेत. सामाजिक विचारात होणारे बदल, सोशल मिडीया, आर्थिक अडचणी, विवाहबाह्य संबंध, व्यसन, अविश्वास, भांडणं आणि शारीरिक जवळीक नसणे अशी बरीचं कारणं ही समोर येत आहेत.
संवादाचा अभाव
सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदाचा संवादाचा मोठा अभाव निर्माण होत असल्याचे जाणवत आहे.. पती-पत्नीमध्ये हवा तसा संवादच होत नाही. जर पती-पत्नी दोघेही ऑफिसात कामं करत असेल आणि दोघांची वेळ ही वेगळी असेल, तर भावनिक अंतर वाढतं. त्यातल्या त्यात पुरेसा वेळ हा एकमेकांना दिला जातं नसेल तर संवादाचा अभाव निर्माण होतो ज्याचे रुपांतर हे गैरसमजाचे कारणात होतं. अशा परिस्थितीत घटस्फोट घेणे आश्चर्यकारक नाही.
सामाजातील विचारात होणारे बदल
पूर्वी घटस्फोट म्हंटलं तर तो माणसावर लागलेला वाईट डाग मानला जात होता. समाजातील लोकं काय म्हणतील या विचाराने पूर्वी घटस्फोटाचा निर्णय घेणे सोपे नव्हते, परंतु हळूहळू आता घटस्फोट घेतलेल्या व्यक्तींना समाजात मान्यता मिळत आहे. आता लग्न मोडणे फार मोठी गोष्ट राहिलेले नाही.
Atul Subhash : अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पत्नीसह 4 जणांवर FIR
सोशल मिडियाचा अती वापर
आजकाल सोशल मिडियाच्या अती वापरामुळे त्याचे नकारात्मक परिणाम हे होताना दिसतं आहे..सोशल मिडियामुळे जग जवळ आल्याने अनेक समस्या या उद्भवत आहेत... तासांतास सोशल मिडियामध्ये गुंतून राहणं यामुळे चिडचिडापणा हा वाढतं असल्याने एकमेकांवर राग काढणं यामुळे ही घटस्फोट हे होतं आहेत.
विवाहबाह्य संबंध आणि फसवणूक
विवाह बाह्य संबंधामुळे घटस्फोटाच्या घटना वाढल्या आहेत. घटस्फोटाचं कारण विचारलं की फसवणूक झाली, विवाह बाह्य संबंध आहेत असे कारणं समोर येतात या कारणांमुळे ही घटस्फोटाची मागणी जोर धरते..
Atul Parchure's wife Sonia : अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया यांनी सांगितल्या आठवणी, झाल्या भावूक
खराब मानसिकता तसेच आर्थिक स्थिती
सध्या लोकांमध्ये ऐसपैस राहण्याचा ट्रेंड आला आहे... त्यामुळे आर्थिक परीस्थिची कमतरता निर्माण झाली की तणबण होते. यावरुन ही भांडणं होण्याची शक्यता असते, पती-पत्नीच्या मानसिक स्थितीसाठी घरातली भांडणं चांगली नसतात. या भांडणातून निर्माण होणाऱ्या स्थितीमुळे देखील घटस्फोट होतो.
एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया, सासू आणि मेव्हण्याला अटक
महिला झाल्या जागरूक
गेल्या काही दशकांमध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनण्याची संधी मिळाली आहे. आज प्रत्येक तरुणी तिच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकते. पूर्वी मुलींना मर्जीशिवाय त्याचे लग्न केले जायचे पण आज ही स्तिथी पूर्णपणे बदलली आहे. जेव्हा त्यांना लग्नानंतर सुद्धा घुसमटल्यासारखे वाटते, तेव्हा त्या स्वतःच्या निर्णयाने घटस्फोट घेतात.
प्रेमविवाहात वाढ
पूर्वी लग्न हे सहसा आई-वडील आणि कुटुंबातील ज्येष्ठ नातेवाईकांच्या ईच्छेनूसार केली जायची.. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कलह झाला तर लग्न वाचवण्याची जबाबदारी त्यांची होती.. आत्ताच्या काळात तरुण-तरुणी प्रेमविवाह करण्यास पसंती देत आहेत.. त्यामुळे त्या जोडप्यांमध्ये होणारी भांडणं सोडवण्याची जबाबदारी ही सहसा त्यांच्यावरच येते अशा परिस्थितीतही, ते स्वतः घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात.
व्यसनाचे वाढते प्रमाण
व्यसन हे विनाशाचे कारण मानले जाते. सध्याच्या तरुण- तरुणींमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण वाढलेलं दिसतं आहे.. दारूच्या सेवनामुळे घटस्फोट होतो असे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे.












Click it and Unblock the Notifications