Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Atul Parchure's wife Sonia : अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया यांनी सांगितल्या आठवणी, झाल्या भावूक

Atul Parchure's wife Sonia shared memories : अतुल परचुरे, ज्यांनी आपल्या अभिनयाने लाखोंच्या हृदयावर राज्य केले, त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट उसळलीय.

अतुल परचुरे यांच्या आयुष्यातील कठीण काळ

अतुल परचुरे हे केवळ एक उत्तम अभिनेता नव्हे, तर एक जिद्दी आणि लढवय्ये व्यक्तिमत्त्व होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते, ज्यामुळे काही काळ ते मनोरंजन विश्वापासून दूर राहिले. परंतु, त्यानंतर त्यांनी कॅन्सरला हरवत जोरदार पुनरागमन केले. या कठीण काळात त्यांच्या बरोबर सिनेविश्वातील आणि राजकीय वर्तुळातील अनेकांनी साथ दिली होती, याविषयी अतुल यांनी वेळोवेळी सांगितले होते.

Atul Parchure s wife Sonia shared memories

मी डाॅक्टरांना म्हणायचे की, त्यांचा आवाज गेला..

अतुल यांच्या पत्नी, नृत्यांगना सोनिया परचुरे यांनी देखील अतुल यांच्या आजाराविषयी आणि त्यावरील लढाईविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, "अतुलचा आवाज जसा कमी व्हायला लागला, तसं मी डॉक्टरांना म्हणायचे की, ओ ह्याचा आवाज गेला... असं नाही चालणार. अतुलचा आवाज महत्त्वाचा आहे," असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. त्यांच्या या भावना ऐकून, कोणत्याही पत्नीच्या मनातील हतबलता आपल्याला जाणवते.

सोनिया परचुरे यांची कारकीर्द

सोनिया परचुरे यांची कारकीर्द देखील त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या कथ्थक नृत्य प्रकारात प्रभुत्व मिळवणाऱ्या एक प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पॅनेल सदस्यांपैकी एक असलेल्या सोनिया यांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नृत्यकलेत उत्तम निपुणता मिळवली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+