एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया, सासू आणि मेव्हण्याला अटक
Atul Subhash Suicide Case : एआय अर्थात कृत्रिम सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिला हरियाणातील गुरुग्राम येथून अटक करण्यात आली असून यासह निकिताची आई आणि मेव्हुण्यालाही अटक करण्यात आली आहे.
माहिती देताना बेंगळुरू व्हाइट फील्ड डिव्हिजनचे डीसीपी शिवकुमार म्हणाले की, अतुल यांच्या पत्नीसह तिची आई संशयीत आरोपी निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया यांनाही प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे, त्यांना कोर्टात हजर करण्यात आले, जिथे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

निकिता सिंघानियाची आई निशा सिंघानिया आणि निकिताचा भाऊ अनुराग यांना पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे, हे लोक येथे लपले होते. या लोकांची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. निशा आणि अनुराग यांना प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी बेंगळुरू पोलिसांनी निकिता सिंघानियाला गुरुग्राममध्ये अटक केली. तसेच 14 डिसेंबरलाच निकिताची आई आणि भावाला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली होती. तिघांनाही प्रयागराज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या पोलीस निकिताचा काका सुशील सिंघानियाचा शोध घेत आहेत, ते सध्या पसार आहेत. सुशीलला अटक करण्यासाठी पोलिस जौनपूरसह अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.
अतुल सुभाष यांचा आत्महत्येपुर्वीचा व्हिडिओ
अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये त्यांनी पत्नी आणि सासरच्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते. व्हिडिओमध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींवर हुंड्याच्या नावाखाली खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला होता.
निकिताने तिचा पती अतुलविरुद्ध हुंड्याच्या मागणीसाठी छळाचा गुन्हा दाखल केला होता. पण अतुल सुभाषने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, माझा पगार 40 लाख रुपये आहे, मग मी 10 लाख रुपये हुंडा का मागू? मी प्राणघातक हल्ला केला असा आरोपही पत्नीचा होता, पण अंगावर काही जखमा झाल्या याचा कोणताही पुरावा नाही असे म्हटले होते. हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली. तेव्हापासून हे प्रकरण सातत्याने चर्चेत राहिले आहे.












Click it and Unblock the Notifications