Thoughts of Babasaheb Ambedkar : आयुष्यभर तुमच्या जीवनाला दिशा देणारे बाबासाहेबांचे विचार..!
Thoughts of Babasaheb Ambedkar, Bhim Jayanti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते. तर त्यांनी समाजातील चालीरीती परंपरा व रुढींवर बोट ठेऊन समाजाची जागृती केली.
बहुजनांना जगण्याची शिकवण दिली. त्यांचा हक्का दिला. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात वावरताना समाजाला दिलेले विचार हे बहुमुल्य आहेत. त्यांनी समाजाला काय संदेश दिला. कोणते विचार दिले ते वाचा, हे विचार आपल्या जीवनासाठी आयुष्यभर उपयुक्त ठरणारे आहेत..! बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम पार पडले.

शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगत बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणाच्या जोरावर माणूस स्वतःची ओळख तयार करू शकतो, अन्यायाविरुद्ध लढू शकतो.
हक्कासाठी लढा द्या, संघर्ष करा
जात, धर्म, लिंग, भाषा यापेक्षा 'माणूस' ही ओळख महत्त्वाची आहे. समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करा. संघर्षाशिवाय हक्क मिळत नाहीत.
स्त्रियांचे हक्क आणि समानता
बाबासाहेबांनी स्त्रियांच्या शिक्षण, संपत्ती आणि स्वातंत्र्याच्या हक्कासाठी अनेक कायदे राबवले. जोपर्यंत स्त्रीला समान हक्क मिळत नाही, तोपर्यंत समाज प्रगत होऊ शकत नाही.
कायद्याच्या मार्गावर चालत रहा
घटना चांगली आहे की वाईट, यापेक्षा घटना राबविणारे लोक कोण? त्यांचा उद्देश कोणता ? यावर राज्यघटनेचे यशापयश ठरेल. कोणताही बदल कायद्याच्या चौकटीत राहूनच झाला पाहिजे.
शेती समृद्ध तर देश समृद्ध
शेती राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. शेती समृद्ध झाली तरच शेतकरी, मजूर अन् देश समृद्ध होण्यास मदत होईल. शेतीला उद्योग म्हणून पुढे केल्यास अर्थव्यवस्था मजबूत झालीच म्हणून समजा.
बदलाचा मूलमंत्र लोकशाहीतच
रक्तपात न घडविता सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त लोकशाहीतच अवगत असल्यामुळे तीच मानवी जीवनाच्या प्रवाहाशी सुसंगत आहे.
राजकीय दृष्टिकोन
राजकारणात भक्ती किंवा विभूतिपूजा म्हणजे अधःपतनाचा मार्ग. त्यामुळे हुकूमशाही प्रवृत्ती वाढते. राजकारणात विशिष्ट लोकांचा दरारा व मक्तेदारी, विषमता हे दृश्य पालटले पाहिजे.
हिंसा नव्हे तर कायदा
समाजपरिवर्तनासाठी हिंसा नव्हे तर कायदा, संविधान आणि संवादाचे मार्ग अधिक प्रभावी ठरतात. हा विचार बाबासाहेब यांनी कायम समाजाला दिला. शांततेच्या मार्गाने सर्व काही प्राप्त करता येते, असा संदेश त्यांनी दिला.
दुर्गुणांची लाज वाटावी
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची, असा विचार बाबासाहेब यांनी दिला. गरीबीपेक्षा तुमचे चारित्र्य महत्त्वाचे आहे. जीवन जगताना हा विचार प्रत्येकाच्या आयुष्यात उपयुक्त ठरतो.












Click it and Unblock the Notifications