Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कर्नाटक सरकारकडून गणपतीला अटक केल्याचा आरोप, देशभरातील हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट!

11 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केल्याची घटना कर्नाटक मध्ये घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ १३ सप्टेंबरला हिंदू बांधवांकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी गणपतीची मूर्ती उचलून पोलीस व्हॅनमध्ये ठेवल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यामुळे पोलिसांनी गणपतीला अटक केली असा आरोप कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर केला जात आहे. या घटनेबद्दल महाराष्ट्रातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पोलिसांच्या या कृतीमुळे गणपतीला अटक केल्याची भावना कर्नाटकातील गणेश भक्तांची झाली आहे, स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच असे चित्र दिसून आले आहे. या घटनेबद्दल महाराष्ट्रातूनही गणेशभक्तांमधून संताप व्यक्त होत आहे.

Alleged arrest of Lord Ganesha by the Karnataka government

मोदींनी गणपतीची केलेली आरती 'मविआ'च्या जिव्हारी

गणपती ही हिंदू धर्मियांची आराध्य देवता आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश वंदनेने केली जाते. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे मराठी भाषिक आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री गणेशाच्या आरतीला उपस्थित राहिले. त्यावरही काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून टीका करण्यात आली. चंद्रचूड यांच्या विश्वासार्हतेवरच काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्या समविचारी पत्रकारांनी टीका करण्यास सुरुवात केल्याचं दिसून आले.

हिंदू देवी देवताला पोलिस व्हॅनमध्ये कसे काय ठेवू शकतात असा सवाल गणेशभक्त व्यक्त करीत आहेत. याबद्दल गणेश भक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू सणवार हे परस्पर स्नेहभाव वाढविण्यासाठी असतात. ही आपली परंपरा आहे. या परंपरेचा काँग्रेस आणि विशेषतः उद्धव ठाकरे गटाला विसर पडला. हिरव्या जाळीदार टोप्या आणि गळ्यात हिरवे रुमाल घालून इफ्तार पार्टी घडणारे नेते गणपतीच्या आरतीला विरोध करतात हे दुर्दैवी म्हणावे नाहीतर काय, असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्ते विचारू लागले आहेत.

भाजपने काँग्रेसला दाखवला आरसा

2009 साली देशात काँग्रेसचे सरकार होते. मनमोहन सिंग तेव्हा पंतप्रधान होते आणि केजी बालकृष्णन सरन्यायाधीश होते. मनमोहन सिंग यांनी शासकीय निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित होते. आज नरेंद्र मोदी यांच्या गणपती आरतीला आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसवाल्यांना मनमोहन सिंग आणि बालकृष्णन यांच्या त्या इतर पार्टीच्या विसर पडला. काँग्रेसला शासकीय निवासस्थानी केलेली इफ्तार पार्टी चालते पण गणेशाची आरती चालत नाही हाच त्याचा अर्थ आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे.

पवारांच्या उपस्थितीत देवतांचा अवमान

संभाजी ब्रिगेड या संघटनेचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. या संघटनेचे आश्रयदाते शरद पवार आणि काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज या कार्यक्रमाला हजर होते. याच कार्यक्रमात प्रभू श्री रामचंद्र, भागवत धर्माची पताका घेणारा वारकरी पंथ आणि लाखो श्रद्धांचे श्रद्धास्थान स्वामी समर्थ यांच्यावर अत्यंत अर्वाच्य भाषेत टीका करण्यात आली. "कमी कपड्यातला माणूस" असा शब्दात स्वामी समर्थांचा उल्लेख करण्यात आला. त्यावेळी शरद पवार आणि शाहू महाराज टाळ्या वाजवत होते असेही लोक सांगतात.

Alleged arrest of Lord Ganesha by the Karnataka government

"गोपाळ बडव्याने तीर्थकुंडात लघुशंका केली म्हणून वारकऱ्यांची संख्या आठ लाखाची अकरा लाख झाली", "धोब्याचे ऐकून बायकोला टाकून देतो तो कसला देव?" अशी मुक्ताफळे या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांच्याकडून उधळण्यात आली. महाराव यांच्या भाषणावर शरद पवार तसेच शाहू महाराज खुदु-खुदु हसत होते. हिंदू धर्माचा यापेक्षा मोठा अपमान असूच शकत नाही, अशी भावना हिंदू धर्मीय व्यक्त करत आहेत.

प्रकरण अंगाशी येत आहे हे लक्षात येताच शरद पवार दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले. तीस वर्षांपूर्वी ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. दरवर्षी न चुकता इफ्तार पार्ट्यांना हजर राहणारे शरद पवार कधी रायगडावर दिसले नाहीत आणि कधी वारीत चालताना दिसले नाहीत, अशी टीका पवारांवर केली जात आहे. मतांच्या राजकारणासाठी फतव्यावर अवलंबून असणारी काँग्रेस, शरद पवार, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी आणि आता त्यांच्या मिठीत असलेली उबाठा हा हिंदू धर्मियांसाठी मोठ्या धोका आहे, अशा प्रतिक्रिया आता उघडपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+