Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विमान अपघात नेमका कसा झाला, काय कसं घडत गेलं? विमान वाहतूक मंत्रालयानं सर्वच सांगितलं, जाणून घ्या

Air India plane crash : अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा हळूहळू वाढतच आहे. अहमदबादहून लंडनला जाणाऱ्या विमान टेकऑफनंतर अवघ्या एका मिनिटात विमान उड्डाणानंतर अगदी एक मिनिटानंतर मेघानीनगरमधील वैद्यकीय वसतिगृह संकुलात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील 241 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकमात्र भारतीय वंशाचा ब्रिटीश नागरीक वाचला. हे विमान वसाहतीत कोसळल्याने वसतीगृहातील भावी डाॅक्टरांचाही मृत्यू झाला, असे वृत्त आहे की, या घटनेत जवळपास 260 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यानंतर आज 14 रोजी 2025 नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अहमदाबाद विमानतळाजवळील विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे.

Air India plane crash

650 फूट उंचीवरुन कोसळले विमान

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शनिवारी 12 जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलेले एअर इंडियाचे विमानात मध्ये किमान 260 लोकांचा मृत्यू झाला. जेव्हा विमानाने टेकऑफ घेतले तेव्हा अपघात होतना फक्त 650 फूट उंचीवर गेले होते. त्यावेळी विमानाच्या पायलटने एटीसी सेंटरला ही गोष्ट कळवली, तेव्हा त्यांनी आता वाचू शकत नाही असा त्याचा शेवटचा संदेश होता.. असे बोलले जात आहे.

विमान वाहतूक मंत्रालयाने काय सांगितला घटनाक्रम?

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत नेमका विमान अपघात कसा झाला, त्यावेळी पायलटची स्थिती काय होती, एटीसी सेंटरकडून काय काय गोष्टी केल्या जात होत्या आदींबद्दल माहिती दिली.

  • 12 जून 2025 रोजी 650 फूट उंचीवर पोहोचल्यानंतर, विमानाची उंची कमी होऊ लागली.
  • यानंतर पायलटने दुपारी 1:39 वाजता एटीसीला मेडे कॉल केला.
  • एटीसीनुसार, जेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
  • केवळ एका मिनिटानंतर, विमानतळापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या मेघानी नगरमध्ये हे विमान कोसळले,"

रस्ते अपघात मी माझ्या वडिलांना गमावलेय - केंद्रीय विमान वाहतूक मंत्री

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू म्हणाले, गेल्या दोन दिवस अत्यंत कठीण होते. "अहमदाबाद विमानतळाजवळील अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. मी माझ्या वडीलांना रस्ते अपघातात गमावले आहेत. त्यामुळे, काही प्रमाणात, कुटुंबातील सदस्यांना होणारी वेदना आणि वेदना मी समजू शकतो. ज्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या तीव्र संवेदना आहेत, असे ते म्हणाले.

विमानांच्या ताफ्याचे निरिक्षण

अहमदाबाद दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या निर्देशानुसार, एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानांच्या ताफ्याचे निरीक्षण सुरू झाले आहे. भारतातील 34 ड्रीमलाइनर्सपैकी आठ विमानांची आधीच तपासणी करण्यात आली आहे, असे सचिव सिन्हा म्हणाले.

दरम्यान, गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली विमान अपघाताप्रकरणी एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. समितीला तीन महिन्यांच्या आत आपला तपास अहवाल सादर करायचा आहे. ही समिती अपघाताच्या प्रत्येक बाजूची चौकशी करेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+