इमर्जंन्सी लँडींग "धावपट्टीवर दुसरे विमान होते म्हणून नव्हे" एअर इंडियाने दिले मोठे स्पष्टीकरण, वाचा
Air India gives clarification : केरळच्या तिरुअनंतपुरमवरुन दिल्ली येथे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट एआय 2455 मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने आणि खराब हवामानामुळे हे विमान चेन्नईला पाठवावं लागलं. या फ्लाईटमध्ये काँग्रेसचे अनेक खासदार आणि जवळपास 100 प्रवासी होते. यामध्ये काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल यांचाही समावेश होता, विणुगोपाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करूनहा प्रवास किती भयावह आणि त्रासदायक होता आणि आपण मृत्यूच्या कसे जवळ पोहोचलो होतो या संदर्भात वक्तव्य केले आहे.

आता त्यांच्या आरोपावर एअरइंडियाने भाष्य करत एक्सवर वेणूगोपाल यांना खास पत्र लिहिले आहे व त्यात त्यांनी घडलेल्या घडामोडीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
केसी वेणूगोपाल यांनी त्यांनी एनआयशी बोलताना आणि त्यांच्या एक्सवरील अकाऊंटवर पोस्ट केली त्यानुसार, विमान जेव्हा पहिल्या प्रयत्नात लँडिंग करत होते तेव्हा रणवेवर आणखी एक विमान होते. आम्हाला कौशल्य आणि नशिबाने वाचवले, असे म्हटले आहे आणि प्रवाशांची सुरक्षा नशिबावर अवलंबून आहे असे म्हटले आहे.
काय म्हणाले वेणूगोपाल?
केसी वेणूगोपाल म्हणाले, जेव्हा जवळपास दोन तासांपर्यंत फ्लाईटला एअरपोर्टवर क्लिअरन्स परवानगीसाठी वाट पाहावी लागली.पहिल्या लँडिंगवेळी धावपट्टीवर एक विमान आधीच होते, त्यामुळे कॅप्टनने मोठ्या शिताफीने दक्षता बाळगत विमान वर नेले आणि सर्व प्रवाशांचा जीव वाचला.
एअर इंडियाने वेणूगोपाल यांना काय दिले स्पष्टीकरण?
एअर इंडियाचे स्पष्टीकरण दिले की, "आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की चेन्नईला वळवण्यात आलेले विमान तांत्रिक समस्येमुळे आणि खराब हवामानामुळे सावधगिरी बाळगून होते. चेन्नई विमानतळावर पहिल्या लँडिंगच्या वेळी चेन्नई एटीसीने तपासणी करण्याचे निर्देश दिले होते, धावपट्टीवर दुसरे विमान असल्याने नाही." असे म्हटले आहे.
एअर इंडियाची एक्सवर पोस्ट
"प्रिय श्री वेणुगोपाल,
आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की चेन्नईला वळवण्यात आलेले विमान तांत्रिक समस्येमुळे आणि खराब हवामानामुळे सावधगिरी बाळगून होते. चेन्नई विमानतळावर पहिल्या लँडिंगच्या वेळी चेन्नई एटीसीने तपासणी करण्याचे निर्देश दिले होते, धावपट्टीवर दुसरे विमान असल्याने नाही. आमचे वैमानिक अशा परिस्थिती हाताळण्यासाठी चांगले प्रशिक्षित आहेत आणि या प्रकरणात, त्यांनी संपूर्ण उड्डाणादरम्यान मानक प्रक्रियांचे पालन केले. आम्हाला समजते की असा अनुभव अस्वस्थ करणारा असू शकतो आणि वळवण्यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तथापि, सुरक्षितता ही नेहमीच आमची प्राथमिकता असते. तुमच्या समजुतीबद्दल धन्यवाद."
केसी वेणुगोपाल यांनी काय सांगितला विमान प्रवासाचा अनुभव?
kc वेणुगपाल यांनी म्हटले की, त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान AI 2455 - मी, अनेक खासदार आणि शेकडो प्रवाशांना घेऊन - आज भयावह दुर्घटनेच्या जवळ पोहचलो. विमान उशीरा निघाल्याने सुरू झालेला प्रवास एका वेदनादायक प्रवासात बदलला. उड्डाणानंतर काही वेळातच आम्हाला अस्वस्थतेचा सामना करावा लागला. सुमारे एक तासानंतर, कॅप्टनने विमानाच्या सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची घोषणा केली आणि विमान चेन्नईकडे वळवले. जवळजवळ दोन तास आम्ही विमानतळावर लँडिंगसाठी परवानगीची वाट पाहत होतो.
यावेळेत पहिल्या प्रयत्नात एक हृदयद्रावक क्षण आला - दुसरे विमान त्याच धावपट्टीवर असल्याचे वृत्त आहे. त्याच क्षणी, कॅप्टनने विमान थांबवण्याच्या जलद निर्णयामुळे विमानातील सर्वांचे प्राण वाचले. दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले.












Click it and Unblock the Notifications