8 वा वेतन आयोग पाडणार पैशांचा पाऊस! कुणाचा किती पगार वाढणार? कधी लागू होणार? वाचा एका क्लिकमध्ये
सध्या भारतात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आठव्या वेतन आयोगाची चांगलीच चर्चा सुरु आहे. याच वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात या वेतन आयोगामुळे किमान १४ हजार ते १९ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा फायदा थेट ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना व ६५ लाख पेन्शन धारकांना होणार आहे. म्हणजेच हा वेतन आयोग लागू झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच होईल, असे सांगितले जात आहे.

वेतन आयोग म्हणजे काय?
वेतन आयोग ही भारत सरकारने स्थापन केलेली एक प्रशासकीय संस्था आहे. वेतन आयोगाचे मुख्य काम म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा आढावा घेणे आणि त्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी शिफारसी करणे. ते वेळोवेळी बनवले जाते. आर्थिक परिस्थिती पाहून पगारात बदल करण्याची शिफारस करणे हे त्याचे काम आहे. आर्थिक परिस्थिती, महागाई आणि राहणीमानाच्या खर्चावर आधारित वेतनश्रेणीत बदल करण्याची शिफारस त्यात केली आहे. त्याच्या शिफारशी २०२६ किंवा २०२७ पर्यंत लागू केल्या जाऊ शकतात.
किती वाढेल पगार?
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, असे मानले जाते की सरकार एप्रिल २०२५ मध्ये ते स्थापन करू शकते. त्याच्या शिफारशी २०२६ किंवा २०२७ पर्यंत लागू केल्या जाऊ शकतात. सध्या मध्यम-स्तरीय सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी दरमहा १ लाख रुपये पगार दिला जातो. आठवा वेतन आयोग लागू झाला तर कसे पगार वाढतील, याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या तरतुदींवर आधारित असेल.
संभाव्य पगारवाढ अशी
- जर १.७५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली,
तर पगार दरमहा १,१४,६०० रुपयांपर्यंत वाढू शकतो.
- जर २ लाख कोटी रुपयांची तरतूद केली,
तर पगार दरमहा १,१६,७०० रुपयांपर्यंत वाढू शकतो.
- जर २.२५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली
तर पगार दरमहा १,१८,८०० रुपयांपर्यंत वाढू शकतो.












Click it and Unblock the Notifications