Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोलकातामध्ये हॉटेलच्या आगीत होरपळून 14 तर आंध्रमध्ये मंदिरातील भींत कोसळून 9 जणांचा मृत्यू

Kolkata/Visakhapatnam Accident News : कोलकाता येथील एका हॉटेलला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. मध्य कोलकाता येथील फालपट्टी मच्छुआ भागातील एका मोठ्या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा होरळून मृत्यू झाला.

त्याचवेळी दुसरीकडे, आंध्र प्रदेशातील श्री शैलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदन उत्सवादरम्यान, भींत कोसळल्याने त्याखाली दबून 7 भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटनांत एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

Accident News

कोलकातामध्ये हॉटेलला आग, 14 जण ठार

कोलकाता पोलिस आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आगीची घटना रात्री साडे आठ वाजेच्या पुढे घडली. ऋतुराज हॉटेलच्या आवारात घडली. 14 मृतदेह सापडले आहेत आणि पथकांनी अनेक लोकांना वाचवले आहे.

आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि बचावकार्य अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे. तपासासाठी एक विशेष पथकही तयार करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले, आग नेमकी कशी लागली व दुर्घटना कशी घडली याची चौकशी केली जात आहे.

मंदिराच्या आवारातील भींत कोसळली, 9 भाविक ठार

दुसरीकडे, बुधवारी सकाळी सिंहचलम मंदिरातील नवीन बांधलेली भिंत कोसळून 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाल्याचे देखील समोर आले आहे. ही घटना वार्षिक चंदनोत्सवम उत्सवादरम्यान घडली. भगवान वराह लक्ष्मी नरसिंह स्वामींच्या निजारूप दर्शनाची वाट पाहत असताना तिकिट रांगेजवळ असलेली भिंत कोसळली. यात भाविकांचा मृत्यू झाला.

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याचा दावा, मदतकार्य सुरू

राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि जखमींना केजीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री वांगलपुडी अनिता यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून करण्यासाठी घटनास्थळी भेट दिली.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे भिंत कोसळली. सुमारे 30 मिनिटे पाऊस आणि जोरदार वारा यामुळे ही दुर्घटना घडली. मंदिराचे वंशपरंपरागत विश्वस्त पुष्पती अशोक गजपती राजू यांनी पहिले औपचारिक दर्शन पूर्ण केल्यानंतर आणि भगवानांना चंदनम अर्पण केल्यानंतर पुढील दर्शनासाठी भाविक रांगेत होते. दरम्यान, तेवढ्याच ही दुर्घटना घडली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+