पोषण पंधरवडा म्हणजे काय? लहान मुलांसाठी 1000 दिवस खास का असतात? जाणून घ्या सविस्तर
भारतात तंत्रज्ञान कितीही प्रगती करत असले तरी, मुलांना पुरेसं पोष्टिक जेवन मिळत नसेल आणि माता स्वतः कुपोषणाशी झुंजत असतील तर कोणतीही प्रगती अपूर्ण राहते. हा विचार मनात ठेवून 2018 मध्ये 'पोषण अभियान' सुरू करण्यात आले आहे. दरवर्षी साजरा केला जाणारा हा पंधरवडा पोषणाशी संबंधित एक मोठी जागरूकता मोहीम आहे. यावेळी 8 ते 23 एप्रिल 2025 पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू मुलांना आणि मातांना चांगले पोषण देणे, तंत्रज्ञानाद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि लठ्ठपणासारख्या नवीन आव्हानांना तोंड देणे आहे.
या वर्षीच्या पोषण पंधरवड्यात चार प्रमुख विषयांवर भर दिला जाईल. मुलांच्या आयुष्याच्या पहिल्या 1000 दिवसांवर लक्ष केंद्रित करणे, पोषण ट्रॅकरचे लाभार्थी, नागरिक मॉड्यूलचा प्रसार, तीव्र कुपोषण केंद्र (CMAM) द्वारे कुपोषणाचे व्यवस्थापन आणि मुलांमध्ये लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा प्रचार.

पंतप्रधानांनी सुरू केलेला प्रमुख उपक्रम, पोषण अभियान, गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि सहा वर्षांखालील मुलांसाठी पोषणात्मक परिणाम सुधारून कुपोषणाविरुद्ध लढण्याचे आपले ध्येय पुढे चालू ठेवत आहे. या वर्षीचा पोषण पंधरवडा सामग्री, सेवा वितरण, प्रसार आणि परिणामांना बळकट करण्यास मदत करेल. व्यापक मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 चा भाग म्हणून हा उपक्रम आरोग्य, कल्याण आणि रोग आणि कुपोषणाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यावर लक्ष केंद्रित करतो.
पोषण मोहिमेद्वारे लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो. मुले आणि महिलांमध्ये निरोगी आणि पौष्टिक आहाराला प्रोत्साहन देणे. यामुळे कुपोषण, बुटकेपणा आणि अशक्तपणासारख्या समस्यांपासून उध्दभवणार नाहीत. या योजनेचे नाव पंतप्रधान व्यापक पोषण योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2018 रोजी याचे उद्घाटन केले होते.
1000 दिवस का महत्त्वाचे आहेत?
मुलांच्या आयुष्यातील त्या 1000 दिवसांबद्दल बोलूया, ज्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. हा तो काळ असतो जेव्हा मूल आईच्या पोटात असते आणि जन्मानंतर पहिल्या दोन वर्षांपर्यंत त्याचा प्रवास सुरू राहतो. या काळात त्याला मिळणारे पोषण त्याच्या आरोग्याचा, मानसिक विकासाचा आणि प्रतिकारशक्तीचा पाया रचते. म्हणजे जर हे 1000 दिवस मजबूत असतील तर मूल आयुष्यभर निरोगी राहू शकते.
पोषण ट्रॅकर अॅपद्वारे मुलांच्या वाढीचा थेट मागोवा घेणे
यावेळी सरकारने तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा मेळ घालण्यावर विशेष भर दिला आहे. आता अंगणवाडीत जड रजिस्टर भरण्याची गरज नाही, उलट मुलांची वाढ, अन्न आणि आरोग्य या सर्व गोष्टी पोषण ट्रॅकर अॅपद्वारे थेट ट्रॅक करता येतील. देशातील प्रत्येक अंगणवाडी केंद्र या अॅप्लिकेशनशी जोडले गेले आहे आणि आता लाभार्थी देखील त्यात स्वतःची नोंदणी करू शकतात.
कुपोषित असलेल्या मुलांची ओळख पटवणे
पोषण पंधरवडा 2025 मध्ये आणखी एक मोठे लक्ष केंद्रित केले आहे - सीएमएएम प्रोटोकॉल. त्याचे पूर्ण नाव 'Community-based Management of Acute Malnutrition आहे. या प्रणालीअंतर्गत अंगणवाडी सेविका गंभीर कुपोषण असलेल्या मुलांची ओळख पटवतात, त्यांना उपचारांसाठी पाठवतात आणि त्यांच्या बरे होण्याचा मागोवा घेतात. आता प्रत्येक अंगणवाडी पोषण केंद्राप्रमाणे काम करू लागली आहे.
लठ्ठपणा कमी करण्यावर असणार भर
पण आजकाल मुलांमध्ये फक्त कुपोषणच नाही तर लठ्ठपणा हा देखील एक नवीन ताण बनला आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्येही वजन वाढण्याची समस्या वाढत आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे जंक फूड आणि कमी शारीरिक हालचाल. हे लक्षात घेता, शालेय कॅन्टीनमध्ये HFSS पदार्थांवर (High Fat, Sugar, Salt) बंदी घालण्यासाठी आणि निरोगी स्नॅक्सला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.












Click it and Unblock the Notifications