बुलढाण्यात आलाय 'टक्कल व्हायरस'?, कशामुळे होती केस गळती, जाणून घ्या-त्यामागील प्रमुख कारणं!
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये केसगळतीच्या व्हायरसने धुमाकूळ घातल्याची बातमी समोर आली आहे. यात सुरुवातीला लोकांना डोक्याला खाज सुटते, त्यानंतर पुढील तीन दिवसांतच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेगावमधील काही गावांमध्ये ही गंभीर समस्या जाणवत असून सरकारकने मात्र अद्याप या समस्यांकडे लक्ष न दिल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. चला तर जाणून घेऊया, या टक्कल व्हायरल नेमका काय आहे. अन् केस गळती नेमकी कशामुळे होते, नेमका काय उपाय केला पाहिजे, वाचा सविस्तर.
आधी जाणून घ्या- नेमका काय आहे टक्कल व्हायरस?
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून, कुटुंबाची कुटुंब केस गळतीमुळे त्रस्त झालेले आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर स्थानिक लोक याला टक्कल व्हायरस म्हणून लागले आहेत.
आरोग्य विभाग अनभिज्ञ, महिलाही मोठ्या प्रमाणात त्रस्त?
या तिन्ही गावातील शेकडो नागरिकांचे टक्कल पडले आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. परंतु एवढा भयंकर प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागरिक उपचार करून घेत आहेत. शाम्पूने असा प्रकार घडत असावा, असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात आहेत.

केस गळतीचे प्रमुख कारणं काय?
दुसरीकजे आजकाल केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे. केस गळतीचे मुख्य कारण चुकीचा आहार, खराब जीवनशैली आहे. परंतु कधीकधी फॅशन आणि स्टाईलच्या नादात देखील केस गळतीची समस्या निर्माण होते. सुरूवातील केस गळतीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, जेंव्हा केस गळती जास्त होते, त्यावेळी केस गळती रोखण्यासाठी आपण उपाय करतो.
केस का गळतात, जाणून घ्या कारणं?
रसायने वापरल्याने केस निर्जीव कोरडे होतात
आपले केस जितके नैसर्गिक ठेवता तितके चांगले असतात. पण हल्ली स्टायलिश दिसण्यासाठी मुली अनेक प्रयोग केसांवर करतात. केस मऊ करणे, सरळ करणे, केराटीन ट्रीटमेंट इ. हे सर्व करण्यासाठी केसांवर विविध रसायने वापरली जातात. यामुळे हळूहळू केस निर्जीव आणि कोरडे होतात.
केसांना तेल लावणे ही फॅशन बनली
फॅशनमुळे अनेकजण केसांना तेल लावत नाही. परंतु लक्षात ठेवा ज्याप्रमाणे आपल्याला पोट भरण्यासाठी खाण्याची गरज असते त्याचप्रमाणे केसांनाही वेळोवेळी तेलाची आवश्यकता असते. यामुळे केसांना पोषण मिळते. केसांना तेल न लावल्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात.
खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे केस गळती वाढली
मानवी जीवनात नियमित खाण्या-पिण्याच्या सवयीमुळेही केस गळतात. बाहेरील तेलकट, फास्ट फूट यासारखे अनेक पदार्थांचे शरीराप्रमाणे केसांवरही विपरित परिणाम होतो. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयन या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते.
केस विंचरण्याची अयोग्य पद्धत ठरते प्रमुख कारणीभूत
केस गळतीचे कारण तुमची केस विंचरण्याची पद्धतही असू शकते. काही जण केसांचा गुंता झाल्यास केस विंचरताना ते खेचतात. त्यामुळे ते तुटतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, केस विंचरताना ते आरामात विंचरा, त्यांना मुळापासून ओढू नका. यामुळे केस कमजोर होऊन ते तुटतात.
गोळ्यांच्या अतिसेवनाचा होतो दुष्परिणाम
काही जण सर्दी, पडसं, अंगदुखी यासारख्या छोट्या छोट्या दुखण्यासाठी गोळ्या खातात. गोळ्यांच्या अतिसेवन केल्यानेही केस गळतीचे प्रमाण वाढते. तणाव, हृदयासंबंधीचे आजार, उच्च रक्तदाब या गोळ्यांच्या सेवनाने केस गळतीच्या समस्या वाढतात.
वाढत्या तणावामुळे होतो विपरीत परिणाम
दैनदिन जीवनात सातत्याने वाढत असलेल्या तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी वाढते. या हार्मोनचा स्राव वाढला किंवा कमी झाला तर समस्या उद्भवू शकतात. दैनंदिन जीवनातील लहान-सहान ताणतणाव आता रोजचाच झाला आहे. ही तणावपूर्ण स्थिती दीर्घकाळ राहिल्यास केस गळू लागतात. कोर्टिसोल, अधिवृक्क ग्रंथीद्वारे तयार होणारे हार्मोन, केस गळतीशी संबंधित आहेत.
काय खाल्ल्याने केस राहू शकतात निरोगी
केसगळती रोखण्यासाठी आंबवलेले पदार्थ खाणं हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो. काही आरोग्य तज्ज्ञांकडून तसा सल्ला दिला जातो. कारण, हे पदार्थ आपल्या आतड्यात असलेल्या मायक्रोबायोटासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. मायक्रोबायोटा हा सूक्ष्मजंतूंचा समूह आहे जो आपल्या आतड्यात असतो. मायक्रोबायोटा आपल्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मायक्रोबायोटा आपण खात असलेल्या पोषक तत्वांसोबत क्रिया करतो.
शरीरातील अन्नाचे चयापचय आणि शरीरातील पोषक तत्वांचे शोषण मायक्रोबायोटाच्या संख्येवर अवलंबून असते. त्याच्या संख्येनुसार, शरीरात भिन्न रासायनिक आणि चयापचय क्रिया होत असतात. यातून ताण तणावाशी लढण्यास देखील मदत होते म्हणजेच आपल्या आहारात विविधता असेल तर आतड्यातील जीवाणूंमध्येही विविधता असते. म्हणूनच प्रोबायोटिक्स जसं की दही, आंबवलेले पदार्थ आणि ताक प्यायल्यास केसांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
(टीप : सदर लेख हा इंटरनेटवरील माहितीच्या आधारावर घेतलेला आहे. यातील कोणताही दावा वनइंडिया मराठी करत नाही. तरी कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)












Click it and Unblock the Notifications