नवरा-बायकोत सतत भांडण होतयं, सुधा मूर्ती यांचे महत्त्वाचे 'हे' नियम कदाचित तुम्हालाही फायदेशीर ठरतील
Relationship Tips from Sudha Murthy: वैवाहिक जीवनात आनंद टिकवून ठेवणे आव्हानात्मक असते. यशस्वी वैवाहिक जीवनात एकमेकांवरचे प्रेम आणि एकमेकांबद्दल आदर असणे खूप महत्वाचे आहे. सुधा मूर्ती यांना अनेक भारतीय आदर्श मानतात. सुधा मूर्ती त्यांच्या भाषणातून आणि पुस्तकांद्वारे वैवाहिक जीवनात यश मिळवण्याबद्दलचे त्यांचे विचार मांडत असतात. वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती राखण्यास मदत करण्यासाठी सुधा मूर्तींचे हे तीन नियम अत्यंत फायदेशीर आहेत.
वैवाहिक जीवनातील मतभेद
प्रत्येकाच्या वैवाहिक जीवनात मतभेद हे होतच असतात. सुधा मूर्ती यांचे म्हणणे आहे की प्रत्येक नवरा बायको मध्ये भांडण होणे ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र भांडणामुळे संसार आणि आपले वैवाहिक जीवन संपणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण -दोष असतात. मात्र एकमेकांना गुण आणि दोषासह स्वीकारणे वैवाहिक जीवनामध्ये आवश्यक असते. आपल्या जोडीदाराला गुणदोषासह स्वीकारले की आपले वैवाहिक जीवन सुखी होते .

वाद विवाद
वैवाहिक आयुष्यामध्ये जर आपला जोडीदार काही कारणास्तव तणावात असेल, चिडचिड करत असेल तर समोरच्याने शांत बसणे कधीही चांगले. जर आरेला का रे केले तर वाद-विवाद वाढू शकतात आणि या वादविवादाचे रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होऊ शकते. आणि कधी कधी अशी भांडणे टोकाला जातात. त्यामुळे आपल्या जोडीदाराची मानसिक स्थिती समजून घेणे वैवाहिक जीवनामध्ये आवश्यक आहे. नाहीतर मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागते.तसेच आपल्या जोडीदाराला काय समस्या आहे हे जाणून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते.
जबाबदाऱ्या आणि मदत
आनंदी आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी एकमेकांना मदत करणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या घरातील पती-पत्नी दोघेही जर नोकरी करत असतील तर घरातील एक काम फक्त पत्नीनेच करावे अशी अपेक्षा न ठेवता पतीने देखील आपल्या पत्नीला मदत करणे आवश्यक आहे,असा सल्ला सुधा मूर्ती देतात. पारंपारिकपणे पुरुषांवर सोपवलेल्या जबाबदाऱ्या स्त्रियांनी देखील स्वीकारल्या पाहिजेत. आनंदी आणि सुखी कुटुंब ठेवायचे असेल तर एकमेकांना सहकार्य करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही सुधा मूर्ती यांनी सांगितले. त्यामुळे नातेसंबंध दृढ होतात आणि त्यामुळे एकमेकांविषयीचा आदर वाढतो.
नातेसंबंधावर सोशल मीडियाचा प्रभाव
सोशल मीडियावर तयार झालेले नात्याचा आपल्या कुटुंबा वर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अवास्तव अपेक्षा पती-पत्नीमध्ये गैरसमज आणि मतभेद निर्माण होतात.त्यामुळे नातेसंबंध चांगले ठेवायचे असेल तर अशा सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे.
सुधा मूर्ती म्हणतात की,संवाद आणि समजूतदारपणाचे सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवावे. सोशल मीडियावरील आकर्षक गोष्टी पाहून तुमच्या नात्यांमध्ये नकारात्मकता न आणता तुमचे नाते मजबूत करण्यावर भर द्यावा,असेही सुधा मूर्ती सांगतात.












Click it and Unblock the Notifications