41व्या वर्षी आई होणार बनू मैं तेरी दुल्हन फेम दिव्यांका त्रिपाठी! उशीरा गर्भधारणेत फॉलो करा या टीप्स
Divyanka tripathi pregnancy : टेलीव्हिजन विश्वातील लाडकी 'इशिता भल्ला' म्हणजेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहिया हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 'बनू मैं तेरी दुल्हन'या मालिकेतून पदार्पण करणारी ही गुणी अभिनेत्री. लग्नाच्या १० वर्षांनंतर दिव्यांका आणि विवेक दहिया यांच्या घरी लवकरच नन्हे पाहुण्याचे आगमन होणार आहे.
४१ व्या वर्षी दिव्यांका आई होणार असल्याने सोशल मीडियावर तिचे कौतुक होत आहे. वयाच्या चाळीशीनंतर आई होणे ही आनंदाची गोष्ट असली तरी, उशीरा गर्भधारणा आरोग्याच्यादृष्टीने काही आव्हाने सोबत घेऊन येते. तुम्हीही जर चाळीशीनंतर मातृत्वाचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी एक परिपूर्ण गाईड ठरेल.

४० नंतरच्या प्रेग्नंसीमधील संभाव्य जोखीम
वैद्यकीय शास्त्रानुसार, ४० वर्षांनंतरच्या गर्भधारणेला 'हाय रिस्क प्रेग्नंसी' मानले जाते. या वयात खालील समस्यांचा धोका असू शकतो.
- प्रजनन क्षमता कमी होणे: गर्भधारणेसाठी नैसर्गिकरित्या जास्त वेळ लागू शकतो.
- आरोग्य समस्या: जेस्टेशनल डायबिटीस (गर्भावस्थेतील मधुमेह) आणि उच्च रक्तदाब (Pre-eclampsia) होण्याचा धोका.
- अनुवांशिक दोष: बाळाला डाऊन सिंड्रोम सारखे दोष असण्याची शक्यता वाढते.
- सिझेरियनची शक्यता: वयोमानानुसार नॉर्मल डिलिव्हरीऐवजी सी-सेक्शनची (C-section) शक्यता अधिक असते.
'लेट प्रेग्नंसी'साठी असा असावा आहार (Diet Plan)
वाढत्या वयात शरीराला अतिरिक्त पोषणाची गरज असते. खालील गोष्टी आहारात नक्की समाविष्ट करा.
- १. फॉलिक ॲसिड: बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी पालेभाज्या आणि डाळींचे सेवन करा.
- २. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D: हाडांच्या मजबुतीसाठी दूध, पनीर आणि नाचणीचा समावेश करा.
- ३. प्रोटीन युक्त आहार: अंडी, सोयाबीन आणि कडधान्ये बाळाच्या अवयवांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत.
- ४. ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स: अक्रोड आणि चिया सीड्स मेंदूच्या विकासासाठी उत्तम ठरतात.
- ५. हायड्रेशन: दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या.
चाळीशीनंतरची गर्भधारणा, महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या
१. NIPT टेस्ट (Non-Invasive Prenatal Testing)
का आहे चाचणी महत्त्वाची आहे: बाळातील डाऊन सिंड्रोमसारख्या अनुवांशिक (Genetic) दोषांची तपासणी करण्यासाठी ही चाचणी केली जाते.
२. GTT - शुगर टेस्ट (Glucose Tolerance Test)
का आहे चाचणी महत्त्वाची आहे: गर्भावस्थेतील मधुमेहाचे (Gestational Diabetes) वेळेत निदान करण्यासाठी ही चाचणी आवश्यक आहे.
३. थायरॉईड प्रोफाईल (Thyroid Profile)
का आहे चाचणी महत्त्वाची आहे: शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आणि बाळाच्या मेंदूच्या विकासात अडथळा येऊ नये म्हणून ही तपासणी केली जाते.
४. टार्गेट स्कॅन (Target Scan / Anomaly Scan)
का आहे चाचणी महत्त्वाची आहे: गर्भावस्थेच्या १८ ते २० आठवड्यांत बाळाच्या शरीरातील अंतर्गत अवयवांची सूक्ष्म आणि सविस्तर तपासणी करण्यासाठी हा स्कॅन केला जातो.
तज्ज्ञांचा सल्ला
- नियमित तपासणी: डॉक्टरांनी दिलेल्या भेटीची एकही तारीख चुकू देऊ नका.
- ताणतणावापासून दूर राहा: पुरेशी झोप घ्या आणि हलका योगाभ्यास करा.
- वजनावर नियंत्रण: संतुलित आहार घेऊन वजन अचानक वाढणार नाही याची काळजी घ्या.
- सप्लीमेंट्स: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या वेळेवर घ्या.












Click it and Unblock the Notifications