Chandra Grahan 2024 : ग्रहण काळात खाणे विषापेक्षा कमी नाही, हे आहे न खाण्याचे कारण आणि नियम वाचा
Chandra Grahan 2024 : या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. हे ग्रहण सकाळी 6.12 वाजता सुरू होत असून ते सकाळी 10.16 वाजता संपेल. या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी वैध राहणार नाही कारण भारतात न दिसणारे हे शेवटचे चंद्रग्रहण आहे
मग काही लोक ग्रहण काळात नियम पाळतात. तर काहीजण पाळतही नाहीत. ग्रहणाच्या वेळी खाल्ले तर काय होईल असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचे उत्तर आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
ग्रहण काळात अनेक क्रिया करण्यास मज्जाव असतो त्याचबरोबर या काळात अन्न खाण्यास सक्त मनाई आहे, असे म्हटले जाते की, चंद्रग्रहण असो वा सूर्यग्रहण, मानसांनी जेवढे खाल्लं तरी त्याला तेवढीच वर्षे नरकयातना भोगावी लागतात या समजुती आपल्याकडे अधिक रुढ आहेत. पण ग्रहण काळात जेवण न करण्यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. चला तर मग जाणून घेऊया चंदग्रहण काळात अन्न का खाऊ नये? आणि जर अन्न खाल्ले तर त्याचे काय परिणाम होतात?

धार्मिक कारणे
शास्त्रात असे सांगितले आहे की ग्रहण कोणत्याही प्रकारचे असो, सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो आणि त्याचा कालावधी आंशिक किंवा पूर्ण असो, ते अशुभ मानले जाते. या काळात अन्न अशुद्ध मानले जाते, म्हणून ते खाण्यावर बंधने आहेत. स्कंद पुराणानुसार ग्रहणकाळात दुसऱ्या व्यक्तीचे अन्न खाल्ल्यास त्या व्यक्तीचे सर्व पुण्य नष्ट होतात.
वैज्ञानिक दृष्टीकोन महत्वाचा
जर आपण या गोष्टीकडे विज्ञानाच्या तर्काने पाहिले तर चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राची किरणे विषारी होतात. त्यातून निघणारे अतिनील किरण सर्व अन्न आणि पाणी दूषित करतात. मात्र, त्याचा परिणाम फक्त शिजवलेल्या अन्नावर होतो. ग्रहण संपल्यानंतर तुम्ही धान्य, फळे आणि भाज्या यांसारख्या न शिजवलेल्या गोष्टींचे सेवन करू शकता.
भोजनात तुळशीचे पाने का ठेवतात
ग्रहणाच्या काळात अन्न दूषित होते आणि असे अन्न खाण्यास योग्य नसते. या अन्नाचा पचनसंस्थेवर परिणाम होतो, म्हणूनच घरातील महिला आपल्या जेवणात तुळशीची पाने ठेवतात कारण त्यात असणारा पारा ग्रहणकाळात बाहेर पडणाऱ्या अतिनील किरणांपासून अन्नाचे संरक्षण करतो. याशिवाय काही लोक तुळशीऐवजी कुशाही घालतात. या लोकांना ग्रहण काळात अन्न खाण्यास मनाई आहे, परंतु त्यांच्या आरोग्याचा विचार करून, वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला आणि रुग्णांसाठी जेवणाबाबतचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. या काळात ते खाऊ-पिऊ शकतात.












Click it and Unblock the Notifications