भेदभाव, जातीपातीवर शाहरुख खानचे वक्तव्य, म्हणाला- 'छाती ठोकून सांगा!' 26/11 दिल्ली स्फोटाबद्दल भावूक
Shahrukh khan on delhi blast 26 11 speech : बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान हा केवळ त्याच्या अभिनयासाठी नाही, तर आपल्या हाजिरजबाबीपणा आणि विचारांसाठी ओळखला जातो. मात्र, शनिवारी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील 'ग्लोबल पीस ऑनर्स २०२५' या कार्यक्रमात शाहरुखचे एक अत्यंत वेगळे, संवेदनशील रूप पाहायला मिळाले. देशातील दहशतवादी हल्ल्यांच्या घटना आणि जुन्या जखमा आठवून त्यांचा गळा भरून आला. २६/११ मुंबई हल्ला, पहलगाम हल्ला आणि दिल्लीतील ताजे बॉम्बस्फोट या हल्ल्यांच्या पीडितांना श्रद्धांजली वाहताना, त्याने देशवासीयांना एकतेची भावनिक साद घातली.

१. पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे सडेतोड संदेश
सिनेस्टार शाहरुख खान यांनी कार्यक्रमात सर्वप्रथम दहशतवादामुळे जीव गमावलेल्या निष्पाप लोकांना आदराने श्रद्धांजली वाहिली. त्याने २६/११ हल्ल्यातील पीडित, पहलगाम हल्ल्यातील बळी आणि नुकत्याच झालेल्या दिल्लीतील बॉम्बस्फोटातील निरपराध नागरिकांना आठवले. तसेच, देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही त्याने आदरपूर्वक नमन केले. देशवासियांना भावनिक साद घालतानाच त्याने पाकिस्तानला सडेतोड संदेश दिला.
#WATCH | Mumbai | At the Global Peace Honours 2025, Superstar Shah Rukh Khan says, "My humble tribute to the innocent people who lost their lives in the 26/11 terrorist attack, the Pahalgam terrorist attack, and the recent Delhi blasts and my respectful salute to our brave... pic.twitter.com/XQtJp0pm1I— ANI (@ANI) November 22, 2025२. जवानांसाठी शाहरुखच्या चार दमदार ओळी
आपल्या भाषणादरम्यान शाहरुखने देशाच्या जवानांच्या शौर्याला सलाम केला. त्यांनी जवानांसाठी चार अत्यंत प्रभावी ओळी वाचून दाखवल्या, ज्यामुळे उपस्थितांचे मन जिंकले.
'तुम्ही काय करता?' असे कोणी विचारल्यास, "गर्व से कहो, की मैं देश की रक्षा करता हूँ!" (छाती ठोकून सांगा, मी देशाचं रक्षण करतो!) 'तुम्ही किती कमावता?' असे कोणी विचारल्यास, "थोडा मुस्कुराओ और कहो, मैं १४० कोटी देशवासियों का आशीर्वाद कमाता हूँ!" (थोडे हसा आणि सांगा, मी १४० कोटी देशवासीयांचा आशीर्वाद कमावतो!) 'तुम्हाला भीती वाटत नाही का?' असे कोणी विचारल्यास, "त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगा... भीती त्यांना वाटते जे आमच्यावर हल्ला करतात!" हा अप्रत्यक्षपणे दहशतवादी शक्तींना दिलेला संदेश होता.
३. 'शांतता असेल, तर भारताला कोणीही हलवू शकत नाही'
शाहरुख खान यांनी आपल्या भाषणाचा समारोप देशाच्या एकतेवर भर देत केला. शांतीशिवाय काहीच नाही, शांतीने विचार जागतो. रस्ते सापडतात, नव्या कल्पनाही येतात. शांती हीच क्रांती आहे. त्याच्या मते, शहीदांचे बलिदान तेव्हाच सार्थक होईल, जेव्हा आपण आपापसात प्रेमाने राहू. त्यांनी देशवासीयांना जात, धर्म आणि पंथ यातील भेदभाव विसरून केवळ मानवतेच्या मार्गावर चालण्याची विनंती केली. "जर आपल्यात शांतता असेल, तर भारताला कोणीही हलू शकत नाही," असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय शांततेचे महत्त्व अधोरेखित केले.
-
LPG सिलिंडरचा तुटवडा? घरगुती गॅससाठी प्रतीक्षा करावी लागणार; सरकारचा मोठा निर्णय, वाचा नवे नियम -
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
विश्वविजेत्या टीम इंडियावर BCCIकडून पैशांचा पाऊस! ICCपेक्षा चौपट अन् 2024च्या पेक्षाही मोठं बक्षीस! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज










Click it and Unblock the Notifications