5 वर्षांत 11 हिट सिनेमे; पण वयाच्या 22व्या वर्षी प्रेमासाठी स्वतः संपवल, काय होतं हे प्रकरण?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने झपाट्याने यश मिळवलेली अभिनेत्री प्रत्युषा यांचं आयुष्य केवळ २२व्या वर्षी थांबलं. ५ वर्षांच्या अल्पशा करिअरमध्ये ११ चित्रपट आणि अनेक मोठ्या नायकांसोबत काम मिळवलेली ही अभिनेत्री प्रेमभंगाच्या दु:खाने आत्महत्येस प्रवृत्त झाली.

तेलंगणाच्या भुवनगिरी गावात जन्मलेल्या प्रत्युषाच्या वडिलांचं लहानपणीच निधन झालं. आई शिक्षिका होती. वडिलांच्या निधनानंतर कुटुंब हैदराबादला स्थलांतरित झालं. हैदराबादमध्येच प्रत्युषाने एका रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि 'सुश्री लवली स्माईल' हा किताब जिंकत तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. याच विजयानंतर तिला सिनेमा क्षेत्रात संधी मिळाली.
१९९८ मध्ये ती अवघी १८ वर्षांची असताना तेलुगु सुपरस्टार मोहन बाबूसोबत तिने पहिला चित्रपट केला. विशेष म्हणजे या चित्रपटाचं उद्घाटन खुद्द रजनीकांत यांच्या हस्ते झालं. पहिल्या चित्रपटानंतरच तिने दोन चित्रपट साइन केले. तिचं सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्त्व पाहता निर्माते-दिग्दर्शक तिच्या मागे लागले.
केवळ दोन-तीन चित्रपटांत झळकल्यानंतर तिला थंबी रामय्यांनी तमिळ चित्रसृष्टीत आणलं. १९९९ मध्ये मुरलीसोबत 'मनुनेथी' या चित्रपटात तिने काम केलं. या चित्रपटामुळे ती तमिळ प्रेक्षकांची लाडकी बनली. त्यानंतर प्रभु, विजयकांत, रामराजन, भारतीराजा यांसारख्या मोठ्या नावांसोबत तिने एकामागून एक हिट चित्रपट दिले.
२० वर्षांची असताना ती अगदी व्यस्त अभिनेत्री होती. तमिळ व तेलुगु दोन्ही भाषांत काम करत होती. मात्र २००२ मध्ये अचानक एक धक्का बसला. प्रत्युषाने आत्महत्या केली होती. हे समजताच संपूर्ण इंडस्ट्री हादरली.
माध्यमांनुसार, लहानपणापासून ती सिद्धार्थ रेड्डी नावाच्या तरुणावर प्रेम करत होती. मात्र सिद्धार्थच्या घरच्यांनी या नात्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे दोघंही आयुष्यात एकत्र राहू शकले नाहीत. शेवटी, २२ फेब्रुवारी २००२ रोजी दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोका-कोलामध्ये विष मिसळून पिलं. सिद्धार्थ वाचला, पण प्रत्युषा दगावली.
ही घटना तिच्याच एका चित्रपटासारखी होती. 'पुन्नई मन्नन' चित्रपटात कमल आणि रेखा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. कमल वाचतो, पण रेखा मरण पावते. प्रत्युषाच्या आयुष्यातही अगदी हेच घडलं.
या घटनेनंतर तिच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या. काही फॉरेन्सिक अहवालांनुसार तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे मृतदेह दिल्लीला तपासणीसाठी पाठवण्यात आला. नंतर अहवालात विषप्राशनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
मात्र तरीही, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका सिद्धार्थवर ठेवण्यात आला आणि न्यायालयाने त्याला सहा वर्षांची शिक्षा आणि सहा हजार रुपये दंड ठोठावला.
प्रत्युषाने फक्त पाच वर्षांत १२ चित्रपट केले. त्यातील ६ चित्रपट तमिळ भाषेतील होते आणि ते सर्वच ब्लॉकबस्टर ठरले. यशाच्या शिखरावर असतानाच तिने प्रेमासाठी आयुष्य संपवलं आणि तिचं उदंड भविष्य अर्ध्यावरच संपुष्टात आलं.












Click it and Unblock the Notifications