Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदुरनंतर 'या' सुंदर अभिनेत्रीचा थयथयाट! म्हणाली - हे भ्याड कृत्य!

Operation Sindoor : भारतीय लष्कराने आज 7 मे रोजी पहाटे दोन वाजता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. यामध्ये पाकिस्तानस्थीत दहशवाद्यांची नऊ तळं उद्धवस्त केली आणि पहलगाम हल्ल्याच्या बदल्याला सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर जगभरातून भारताने केलेल्या कारवाईचे समर्थन होत आहे. अशातच एका अभिनेत्रीने मात्र भारताने केलेल्या कारवाईबद्दल थयथयाट केला आहे.

पाकिस्तानला त्यांच्या 'ना'पाक कृत्याला प्रत्युत्तर आज भारताने दिले. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हा हवाई हल्ला केला आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले.

Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूरवर या अभिनेत्रीचा थयथयाट

ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिने थयथयाट केला आहे.तिचा थयथयाट पाहून आता ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

काय म्हणाली अभिनेत्री हानिया आमिर?

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिने भारताने केलेल्या एअरस्ट्राईकला हा हल्ला भ्याड आणि लज्जास्पद असल्याचे वर्णन केले आहे. दरम्यान, हानिया आमिरने दोन इंस्टा स्टोरीज शेअर केल्या. पहिल्या स्टोरीत तिने लिहिले की, भित्रेपणा. तर दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले होते की, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. माझ्या मनात खूप राग, वेदना आणि अशांतता आहे. एका मुलाने आपला जीव गमावला आहे. कुटुंबे विखुरली गेली आहेत. आणि हे कशासाठी आहे? अशा प्रकारे तुम्ही एखाद्याचे रक्षण करत नाही. ही तर उघड क्रूरता आहे. तुम्ही अशा निष्पाप लोकांवर बॉम्ब टाकू शकत नाही आणि त्याला रणनीती म्हणू शकत नाही. ही तुमची ताकद नाही. हे भ्याडपणा आहे. आम्ही तुम्हाला पाहत आहोत.

हानियासह पाकिस्तान्यांच्या सर्व सोशल अकाऊंट्सवर बंदी

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातून सहवेदना तर सोडाच पण उलट प्रतिक्रीया येत होत्या. यादरम्यान, भारताने पाकिस्तानविरोधात कडक धोरणे अवलंबवली आणि पाकिस्तान्यांना देश सोडण्याचे सांगितले तसेच इतर कारवाईसह
हानिया आमिरसह सर्व पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली आहे.

पहलगाम हल्ल्याला लष्कराकडून प्रत्युत्तर

22 एप्रिल रोजी पहागाममध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना ठार मारले. यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पंतप्रधान आणि लष्कराकडून योग्य उत्तर मिळावे अशी प्रत्येकाची मागणी होती. भारताने यापूर्वीच दहशतवादी हल्ल्यांना हवाई हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा : Operation Sindoor ऑपरेशन सिंदुरनंतर जयशंकर यांची एका वाक्यात पोस्ट! डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+