Operation Sindoor ऑपरेशन सिंदुरनंतर जयशंकर यांची एका वाक्यात पोस्ट! डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? वाचा
Operation Sindoor S Jaishankar's post on X and Donald Trump's reaction : पाकिस्तानात दहशतवाद्यांची नऊ तळं लक्ष्य केल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एक एक्सवर पोस्ट केली आहे. आता ही पोस्ट चर्चेत असून जगाने दहशवाद सहन करु नये असे म्हटले आहे तर दुसरीकडे असे होणारच होते..असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्यामार्फत प्रतिक्रीया आली आहे.

भारताने मध्यरात्रीनंतर 6 मे 2025 दोनच्या सुमारास पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक केले. हवाई हल्ला करुन विमानांनी दहशतवाद्यांची नऊ तळं उडवली आहेत. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असे नाव देण्यात आले आहे. विशेषतः भारतीय लष्कराने हा हल्ला सांगून केला.
Graphic representation of the targets taken by the Indian Armed Forces under #OperationSindoor in Pakistan and PoJK https://t.co/cEasBn51U9 pic.twitter.com/HMONRGQxWW
— ANI (@ANI) May 7, 2025
भारताचा दहशतवादी तळांवर सांगून हल्ला
भारतीय लष्कराच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट काल करण्यात आली आहे. त्यात विजयासाठी हल्ला करण्यास सज्ज असे म्हटले होते. ही पोस्ट संस्कृत आणि इंग्रजीत आहे. या पोस्टसोबतच लष्कराने एक व्हिडिओही शेअर केला आहे. आता या व्हिडिओची चर्चा होत आहे, विशेष म्हणजे पाकिस्तानला पुर्वसूचनाच एकप्रकारे ही होती असे आता बोलले जात आहे. ही पोस्ट केल्यानंतर काहीवेळातच भारतीय संरक्षण मंत्रालयाने पाकमध्ये दहशतवादी तळावर हल्ला केल्याचे स्पष्ट केले.
The world must show zero tolerance for terrorism. #OperationSindoor pic.twitter.com/dmcCLfbMjN
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 7, 2025
एस जयशंकर यांची एक्सवर पोस्ट काय?
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदुरनंतर एक पोस्ट एक्सवर टाकली आहे. यात त्यांनी भारतीय लष्कराने पोस्ट केलेला ऑपरेशन सिंदुरचा फोटो आणि त्यावर जगाने दहशतवादाबद्दल शुन्य सहनशीलता दाखवावी अशी पोस्ट केली आहे. एकप्रकारे भारत दहशतवादाविरोधात किती कडक धोरण राबवतो आणि दहशतवाद सहन करत नाही हे दाखवून देण्याचा आणि जगाला आवाहन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले?
तर दुसरीकडे भारताने पाकवर एअर स्ट्राईक केल्यानंतर अमेरिकेला एअरस्ट्राईकची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि हे लवकर संपावं अशी आशा आहे. मी भारत आणि पाक नैतृत्वाशी चर्चा करत राहील असेही ते म्हणाले.
Earlier this afternoon, Secretary Marco Rubio spoke to the national security advisors from India and Pakistan. He urged both to keep lines of communication open and avoid escalation: US Department of State pic.twitter.com/N996E8dJpz
— ANI (@ANI) May 7, 2025
पाकवर स्ट्राईक, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
पाकिस्तानवर स्ट्राईक झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही लाजीरवाणी बाब असे म्हटले आणि त्यानंतर असे काहीतरी होईल याचा अंदाज सर्वांनाच होता. आम्हाला एअर स्ट्राईकबाबत आत्ताच माहिती मिळाली आहे असे म्हणत त्यांनी काहीतरी घडणार हे गेल्या काही दिवसांपासून लोकांना वाटत होते असे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष बऱ्याच काळापासून सुरु आहे. त्यामुळे मी आशा करतो की, हे सर्व लकवर संपावं असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications