Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मिर्झापूर सीझन 3, प्रतीक्षा संपली! तिसरा भाग पाहायचायं ना...?

मुंबई : बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर 3' आज (ता. ५) प्रदर्शित झाला आहे. सीजन -2 मधून अनेक प्रश्न मनात होते, यामध्ये गुंडांची भूमिका करणारा गुड्डू पंडित मिर्झापूरची गादी सांभाळू शकेल की नाही? गोलूचा प्लॅन पूर्ण होईल की नाही?

Mirzapur Season 3

छोटे त्यागीचे पुढील लक्ष्य काय असेल? मरणाच्या उंबरठ्यावरून हळूहळू परतणाऱ्या कालिन भैय्याचं आता काय होणार? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे... मुन्ना भैया परत येईल की नाही? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा 'मिर्झापूर 3'चा सीझनमधून उलगडा होणार आहे.

आधी मिर्झापूरच्या दुसऱ्या सिझनविषयी सांगायचं झाल्यास शेवटी, गुड्डू पंडित, मुन्ना त्रिपाठी आणि कलेन भैया यांच्यावर गोळीबार करतो असे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर तिसरा सीझन इथून पुढे सुरू होतो. मिर्झापूरचा तिसरा सीझन गोलूच्या पात्रापासून सुरू होतो. कालेन भैय्याचा मृतदेह सापडल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. कालेन भैय्याच्या जाण्याने पूर्वांचलची सत्ता विखुरली. गुड्डू पंडितला सिंहासनावर बसून बाहुबली व्हायचे असले तरीही सत्ता मिळवावीच लागते हा साधा नियम आहे.

कसे आहे अली फजलचे पात्र?

अली फजलच्या भूमिकेबद्दल बोलायचे तर त्याने गुड्डू पंडितची दमदार भूमिका साकारली आहे. अली फजलने आपल्या प्रतिभासंपन्न अभिनयाने या व्यक्तिरेखेला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. गोलू (श्वेता त्रिपाठी) बद्दल सांगायचे तर, पहिल्या सीझनमध्ये ती पुस्तकांमध्ये हरवलेली दिसते, पण तिसऱ्या सीझनमध्ये पूर्ण मेकओव्हर पाहून तिचे मन हेलावून जाते. कालिन भैय्या या मालिकेतील जीवन पंकज त्रिपाठीची भूमिका तिसऱ्या सीझनमध्ये कमी दाखवण्यात आली आहे. मात्र तरीही त्याने मिळालेल्या संधीतच फायदा उठवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रसिका दुग्गलनेही कालेन भैय्याच्या पत्नी बीना त्रिपाठीची दमदार भूमिका साकारली. विजय वर्माचा अभिनय चांगला आहे पण तसा फारसा भावत नाही.

कालिन भैया आणि गुड्डू यांच्यात संघर्ष?

स्पष्टपणे सांगायचे तर, मिर्झापूर 1 आणि मिर्झापूर 2 ने रसिकांवर पाडलेली छाप मिर्झापूर 3 सोडू शकला नाही. कलीन भैय्याला पडद्यावर कमी अभिनय देणे हेही यामागचे एक कारण आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांना असे वाटले की, कलेन भैया आणि गुड्डू पंडित यांच्यात चुरशीची लढत होईल, परंतु जेव्हा ते हा सीजन पाहतील तेव्हा त्यांची खूप निराशा होईल.

'मिर्झापूर 3'ची कथा खरंच दमदार आहे?

कलीन भैयाच्या स्क्रीनटाइमशिवाय, पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये कथाही तितकी मजबूत नाही. काही दृश्ये जबरदस्त वाटतात. कथा लांबणीवर टाकण्यासाठी काही दृश्ये आवास्तव दाखविण्यात आल्याचे दिसत होते. मुळातः ही कथा सात एपिसोड्समध्ये पूर्ण होऊ शकली असती पण ती लांबलचक करुन अवास्तव दाखवण्यात आल्याचे वाटते. त्यामुळे कथा अधिकतम एपिसोड्समध्ये लांबवल्याने प्रेक्षकांना थोडा कंटाळा येतो.

जर तुम्ही 'मिर्झापूर'चे चाहते असाल तर...

कथेच्या क्लायमॅक्सबद्दल सांगायचे तर हा सीक्वेन्स खूपच मजेशीर होता. हे पाहिल्यानंतर तुम्हाला मिर्झापूरच्या चौथ्या सीझनबद्दलची हिंट सहज मिळेल. एकंदरीत, तुम्ही मिर्झापूरचे चाहते असाल तर तुम्ही तिसऱ्या सीझनकडून खूप अपेक्षा ठेवू नका. या मालिकेचा ट्रेलर दमदार वाटत असला तरी त्याचे भाग तुलनेत दमदार नाहीत. ट्रेलरमध्ये गुड्डू पंडित आणि कालिन भैया यांच्यातील संघर्षाचा इशारा या सीजनमध्ये दिसत नाही. दोघेही या सीजनमध्ये एकमेकांसमोर येत नाहीत. त्याचवेळी मुन्ना त्रिपाठीची अनुपस्थिती प्रेक्षकांना जाणवते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+