नेपाळच्या आंदोलनाला मनीषा कोईराला 'हा काळा दिवस' म्हणाली,तिचा अन् नेपाळचा संबंध काय? घ्या जाणून
Manisha Koirala called Nepal's protests this is a black day : नेपाळमध्ये सरकारविरोधी आंदोलन पेटले आहे. सरकारने सामाजिक माध्यमांवर बंदी घातल्याने लोक रस्त्यावर उतरले. या आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यात २० आंदोलकांचा मृत्यू झाला आणि २५० हून अधिक लोक जखमी झाले. यामुळे देशात तणाव वाढला आहे. भारतीय सिने रसिकांच्या गळ्यातील ताईत आणि प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला हिने नेपाळच्या आंदोलनावर कठोर टीका केली आहे. 'आजचा दिवस नेपाळसाठी काळा'दिवस म्हटले आहे.

या हिंसक घटनेवर बॉलिवूड आणि नेपाळी अभिनेत्री मनीषा कोईरालाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तिने या घटनेला नेपाळसाठी 'काळा दिवस' म्हणत आपल्या सामाजिक माध्यमांवर एका रक्ताने माखलेल्या बुटाचा फोटो शेअर केला.
काय आहे अभिनेत्री मनीषा कोईरालाची पोस्ट
मनीषा कोईराला हिने पोस्ट केली की, "आजचा दिवस नेपाळसाठी काळा दिवस आहे. जेव्हा लोकांच्या आवाजाला गोळ्यांनी उत्तर दिले जाते, भ्रष्टाचार आणि न्यायाच्या मागणीसाठी आवाज उठवणाऱ्यांवर गोळीबार केला जातो, तेव्हा हा देश काळा दिवस साजरा करत आहे."
मनीषा कोईराला आणि नेपाळचा संबंध काय?
मनीषा कोइराला हीमुळ नेपाळची आहे. तिचा जन्म १६ ऑगस्ट १९७० रोजी नेपाळमधील बिराटनगर येथे राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित कोइराला कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव प्रकाश कोइराला आहे. ते नेपाळमध्ये राजकारणी होते आणि त्यांनी नेपाळ सरकारमध्ये पर्यावरण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम केले. मनीषा कोइरालाचे आजोबा विश्वेश्वर प्रसाद कोइराला हे नेपाळचे माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य राजकारणात सहभागी आहेत.
मनीषा कोईरालाचे चित्रपट कोणते?
मनीषा कोईराला ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'दिल से', 'बॉम्बे' आणि '१९४२: अ लव्ह स्टोरी' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. अलीकडेच, ती संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या नेटफ्लिक्स मालिकेमुळे चर्चेत आली. तिच्या 'मल्लिकाजान' या भूमिकेचे खूप कौतुक झाले.
आंदोलनाचे कारणे काय?
पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारने २६ सामाजिक माध्यमांवर बंदी घातली. सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत होते. या आरोपांना दाबण्यासाठी सरकारने ही बंदी आणल्याचे मानले जात आहे. या बंदीच्या विरोधात आजची तरुण पिढी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली आणि त्यांनी संसदेच्या इमारतीवर मोर्चा काढला.
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि रबरी गोळ्यांचा वापर केला. देशातील परिस्थिती हाताळण्यासाठी काठमांडू, बीरगंज, पोखरा, बुटवल अशा अनेक शहरांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. शहरांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications