अल्लू अर्जुनने रात्रभर तुरुंगात काय केले..? पोटभर जेवला नाही, नीट झोपलाही नाही; वाचा, इत्यंभूत माहित
Allu Arjun's Night In Jail- दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची आज सकाळी तुरुंगातून सुटका झाली. अटक झाल्यावर त्याला लगेच जामीन मिळाला मात्र जामिनाची प्रत तुरुंग अधिकाऱ्याला न मिळाल्यामुळे एक रात्र अल्लू अर्जुनला तुरुंगात काढावी लागली. दरम्यान, तेलंगणा हायकोर्टने अल्लू अर्जुनला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशानंतर अल्लू अर्जुनला कडक सुरक्षेत चंचलगुडा तुरुंगात पाठविण्यात आले होते. आज सकाळी त्याची सुटका झाली.

कशामुळे थांबला रात्रभर तुरुंगात?
तेलंगणा हायकोर्टाने शुक्रवारीच अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारागृह अधिकाऱ्यांना त्याच्या जामिनाची प्रत मिळू शकली नव्हती. सूत्रांच्या सांगण्यानुसार, जामीनाची प्रत जरी मिळाली असती तरी ती आधी तपासण्यात आली असती. त्यामुळे अशा परिस्थिथीत शुक्रवारी रात्रीच अल्लू अर्जनची सुटका शक्य नव्हती. त्यामुळेच आज, शनिवारी सकाळी सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर आला. तत्पूर्वी, आदल्या दिवशी, उच्च न्यायालयाने अभिनेता अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि या प्रकरणाच्या तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.
#WATCH | Hyderabad, Telangana: Actor Allu Arjun released from jail.
— ANI (@ANI) December 14, 2024
He was taken to Chanchalguda Central Jail yesterday after a Court sent him to a 14-day remand. Later, he was granted interim bail by Telangana High Court on a personal bond of Rs 50,000. pic.twitter.com/Xqu3KpBAt6
कशी गेली अल्लू अर्जुनचा रात्र?
काही मीडियाने अल्लू अर्जुनची रात्र कशी गेली याबाबत सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता अल्लू अर्जुनला जेलच्या नियमांनुसार रात्रीचे जेवण देण्यात आले. मात्र त्याने अगदीच थोडे जेवण केले. त्याच्या घशाखाली घासही उतरत नव्हता, असे समजते. त्यानंतर झोपण्यासाठी त्याला बेड आणि उशी देण्यात आली. मात्र त्याला सुरुवातीला झोप लागली नाही. त्यानंतर त्याने उठत बराकीत काही वेळ फेऱ्या मारल्या. त्यानंतर उशीरा बेडवर झोपला मात्र त्याला झोप येत नव्हती. तो अनेकदा या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिला. चेहऱ्यावरुन त्याची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तुरुंगाबाहेर मात्र त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मृताच्या पतीचा यू-टर्न
अल्लू अर्जुनला ज्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अटक केली, त्या घटनेतील मृत महिलेचा पती भास्कर यांनी काल प्रसारमाध्यमांना अल्लूविषयी कोणतीच तक्रार नसल्याचे सांगितले. माझ्या मुलाला पुष्पा-२ हा चित्रपट पहायचा होता, म्हणून मी त्याला घेऊन आलो होतो. तेथे अभिनेता अल्लू अर्जुन येणार आहे, मला माहित नव्हते. शिवाय झालेल्या चेंगराचेंगरीत अल्लू अर्जुनची काहीच चूक नाही. तसे असेल, तर मी माझी तक्रार मागे घेतो. मात्र यात अल्लू अर्जुनला दोषी धरू नका, असं मृताच्या पतीने स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications