मोठा खुलासा! धर्मेन्द्र यांची पंजाबची 'एवढी' संपत्ती सनी-बाॅबी देओल यांना नाही, मग कुणाला दिली? वाचा
Dharmendra's Punjab Property Revealed : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेन्द्र यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीच्या वाटपाबद्दल अनेक चर्चांना उधाण आले आहे. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ८९ व्या वर्षी या हुरहुन्नरी अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची संपत्ती कोणाकोणाला मिळणार, याबद्दल तर्कवितर्क लावले जात असतानाच, त्यांच्या पंजाबमधील वडिलोपार्जित (पुश्तैनी) मालमत्तेबद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे.

पंजाबमधील पुश्तैनी मालमत्ता मुलांना मिळाली नाही
धर्मेन्द्र यांनी दोन विवाह केले आणि त्यांना सनी, बॉबी, विजेता, अजीता, ईशा आणि अहाना अशी एकूण सहा मुले आहेत. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, पंजाबमधील धर्मेन्द्र यांची वडिलोपार्जित मालमत्ता त्यांच्या सहापैकी एकाही मुलाला मिळालेली नाही.
मालमत्तेची किंमत: सध्याच्या बाजाराभावानुसार, पंजाबमधील या पुश्तैनी जमिनीची किंमत अंदाजे ५ कोटी रुपये आहे.
वाटप: नियमांनुसार या जमिनीवर धर्मेन्द्र यांच्या मुलांचा हक्क असायला हवा होता, परंतु अभिनेत्याने ही जमीन मृत्यूआधीच इतर कुटुंबीयांना सोपवली आहे.
चुलत भावांना आणि चुलतीला दिली जमीन
धर्मेन्द्र यांचा जन्म पंजाबमधील नसराली गावात झाला, तर ते लुधियाना येथील डांगन गावात लहानाचे मोठे झाले. १९५० च्या दशकात ते अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला गेले असले, तरी त्यांच्या वडिलांच्या जमिनीची देखभाल त्यांचे चुलत भाऊ आणि त्यांच्या मुलांनी केली.
धर्मेंद्र यांची उदारता
धर्मेन्द्र केवळ आपल्या कुटुंबाप्रतीच नव्हे, तर गावातील नातेवाईकांवरही भरभरून प्रेम करणारे होते. धर्मेन्द्र यांनी मृत्यूआधीच आपल्या पुश्तैनी जमिनीचा मोठा हिस्सा आपल्या चुलत भावांच्या नावावर केला. तसेच, काही जमीन चुलतीला देखील दिली आहे. धर्मेन्द्र यांनी सुमारे २.५० एकर पुश्तैनी जमीन त्यांच्या चुलत भावांसाठी सोडली आहे, जी सुमारे १९ कनाल ११ मरले इतकी आहे.
धर्मेन्द्र यांचे चुलत भावाचे मुलं लुधियानातील कापड गिरणीत काम करतात, यांनी सांगितले की, "आजच्या काळात लोक एक इंच जमीनही देत नाहीत, पण धर्मेन्द्र यांनी आम्हाला आपली 'मूळ' मानून इतकी मोठी जमीन दिली."
कुटुंबाचे नाते कायम
धर्मेन्द्र यांची ९५ वर्षांच्या चुलती प्रीतम कौर आजही डांगन गावात राहतात. बुटा सिंग यांनी सांगितले की, धर्मेन्द्र मुंबईला स्थलांतरित झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबातील संबंध आणि स्नेह आजही तितकाच मजबूत आहे. धर्मेन्द्र यांनी ही जमीन 'त्याच रक्ताच्या नात्याजवळ' राहावी, असे मानले आणि म्हणूनच त्यांनी आपल्या चुलत भावांना ही जमीन सोपवली.
हेही वाचा : पतीला गमावल्यानंतर हेमामालिनींचे 'ते' वक्तव्य! 3 विशेषणं अशी वापरली ज्यातून धर्मेंद्र उलगडले..












Click it and Unblock the Notifications