Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज
Eid mubarak 2026 wishes messages marathi : ईद हा केवळ सण नाही, तर तो कृतज्ञता, प्रेम आणि एकमेकांना जवळ आणणारा एक सोहळा आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर येणारी ही ईद आपल्या प्रियजनांसोबत साजरी करण्याची मजा काही वेगळीच असते. अनेकदा मनात भावना असूनही त्या शब्दांत कशा मांडायच्या, असा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणूनच, यंदाची तुमची ईद अधिक खास बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत २५ निवडक आणि मनाला भिडणारे शुभेच्छा संदेश, जे तुम्ही व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सहज शेअर करू शकता.

कुटुंबासाठी खास संदेश
- ईद मुबारक! आपले घर नेहमी प्रेम, हास्य आणि आशीर्वादाने भरलेले राहो.
- सर्वात महत्त्वाच्या लोकांसोबत आणखी एक ईद साजरी करायला मिळतेय, यासाठी मी कृतज्ञ आहे.
- अल्लाह आपल्या कुटुंबाला सुख, आरोग्य आणि अनंत शांती देवो. तुम्हा सर्वांमुळेच माझी ईद पूर्ण होते.
- आपल्या कुटुंबातील बंध प्रत्येक ईदसोबत अधिक घट्ट होत जावोत, हीच प्रार्थना.
मित्रांसाठी 'क्रेझी' शुभेच्छा
- माझ्या 'निवडक' कुटुंबाला (मित्रांना) ईद मुबारक! तुम्ही आहात म्हणून आयुष्य सुंदर आहे.
- ही ईद तुझ्या आठवणींसारखीच खास आणि गोड असावी.
- गोड स्वादिष्ट शिरखुर्मा, भरपूर हास्य आणि थोडा गोंधळ... चला ही ईद यादगार बनवूया!
- ईद मुबारक दोस्ता! पुढील पार्टी आणि आठवणींसाठी लवकरच भेटूया.
जोडीदारासाठी रोमँटिक संदेश
- तुझ्यासोबत ईद साजरी करणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी ईदी आहे. ईद मुबारक, प्रिय!
- या ईदच्या निमित्ताने आपण आणखी जवळ येऊया. तू सोबत असलीस/असलास की प्रत्येक दिवस सणासारखा वाटतो.
- माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आशीर्वादाला ईद मुबारक!
- मला या ईदला काहीही नकोय, फक्त तुझी साथ हवी आहे.
व्हॉट्सॲपसाठी छोटे आणि गोड संदेश
- ईद मुबारक! प्रेम, प्रकाश आणि भरपूर बिर्याणीच्या शुभेच्छा!
- तुमचे आयुष्य सुख, समृद्धी आणि शांतीने भरलेले राहो.
- ईदच्या शुभेच्छा! नेहमी हसत राहा आणि आनंदी राहा.
- ईदचा चाँद तुमच्या आयुष्यात प्रकाश पसरवत राहो, ईद मुबारक!
इंस्टाग्राम कॅप्शन आयडिया (Instagram Captions)
- ईद स्टेट ऑफ माईंड
- सर्व्हिंग लुक्स अँड ब्लेसिंग्स! #Eid2026
- कृतज्ञता, ग्लॅम आणि उत्तम जेवण!
- ब्लेस्ड, ड्रेस्ड आणि ईद-ऑब्सेस्ड!
- शिरखुर्मासारखे आपले जीवन सदैव गोड असावे..ईदच्या शुभेच्छा
अर्थपूर्ण आणि विचारप्रवृत्त संदेश
- ..ही ईद तुमच्या आयुष्यात शांती आणि आनंदाचा नवा अध्याय घेऊन येवो.
- प्रार्थना करा की तुमची सर्व दु:ख दूर होऊन मन शांत राहो.
- ईद म्हणजे दयाळूपणा आणि कृतज्ञतेची आठवण. हाच उत्साह वर्षभर मनात टिकवून ठेवूया.
- ईद म्हणजे स्नेह, बंधूभाव, भुतदया, ईद म्हणजे आनंद, ईद म्हणजे सुख-दुखः वाटून घेत एकमेकांचे हित जोपसणे.. ईदच्या शुभेच्छा!!












Click it and Unblock the Notifications