धनश्री वर्मा आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाचे कारण आले समोर, घ्या जाणून
Dhanashree Yuzvendra Divorce: प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांच्यात घटस्फोट झाला आहे. या जोडप्याने 20 मार्च रोजी घटस्फोटाची घोषणा केली आहे. दरम्यान दोघांनीही अद्याप त्यांच्या वेगळे होण्याचे कारण उघड केलेले नाही. पण एका रिपोर्टनुसार त्यांच्या घटस्फोटामागील खरे कारण समोर आले आहे.
मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार विकी लालवानी यांच्या मते, लग्नानंतर चहल आणि धनश्रीमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. धनश्रीला नेहमीच चहलने मुंबईत तिच्यासोबत राहावे असे वाटत होते. पण चहलचे आईवडील हरियाणामध्ये राहतात. त्यामुळे चहल मुंबईत येण्यास तयार नव्हता. धनश्रीला त्याच्यातील ही गोष्ट आवडली नाही. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले.

विकी लालवानी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "लग्नानंतर चहल आणि धनश्री हरियाणामध्ये चहलच्या पालकांसोबत राहू लागले. जेव्हा गरज पडेल तेव्हाच मुंबईत येत असे. मुंबई-हरियाणा वाद हा त्यांच्या घटस्फोटाचे मुख्य कारण बनला. चहल त्याच्या पालकांचे घर सोडण्यास तयार नव्हता."
चहलने धनश्रीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण ती तयार झाली नाही. त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणे सुरू झाली. दरम्यान या जोडप्याने किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यांच्या अधिकृत निवेदनात दोघांनीही म्हटले आहे की, त्यांनी परस्पर संमतीने आणि चांगल्या संबंधसह वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
वांद्रे कुटुंब न्यायालयाने 20 मार्च रोजी धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली. आयपीएल 2025 सुरु होण्याच्या अगदी दोन दिवस ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. बार अँड बेंचच्या मते, चहलने धनश्री वर्मा यांना 4.75 कोटी रुपये पोटगी देण्याचे मान्य केले आहे. त्याने आधीच 2.37 कोटी रुपये दिले आहेत आणि घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम लवकरच देण्यास तयार आहे.












Click it and Unblock the Notifications