बॉलिवूड चित्रपट निर्माते सुभाष घई यांना नेमकं काय झालं, ICU मध्ये दाखल का करावे लागले, डॉक्टरांनी...
Subhash Ghai was admitted to the hospital : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांची प्रकृती शनिवारी रात्री अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना बुधवारपासून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि वारंवार चक्कर देखील येत होती. सध्या त्यांच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
रुग्णालयाच्या सूत्रांकडून काही माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष घई यांच्यावर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. डॉक्टरांच्या निगराणी खाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती पाहून आज रविवारी त्यांना आयसीयूमधून बाहेर काढले जाऊ शकते.

(Photo Source :@SubhashGhai1)
अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक
सुभाष घई यांनी बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. कालीचरण, कर्ज, कर्मा, सौदागर, खलनायक या चित्रपटांतून त्यांनी आपला ठसा उमटवला. सुभाष घई यांनी शाहरुख खानचा परदेस हा चित्रपट बनवला होता. याशिवाय 2008 मध्ये त्यांनी ताल आणि सलमान खानचा युवराज या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे काम सातत्याने सुभाष घई करत आलेले आहेत. तर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ते नवकलाकारांना देखील संधी देतात.
या सिनेमाचा काढणार सिक्वेल
2004 मध्ये रिलीज झालेल्या ऐतराजचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले नाही, परंतु त्यांनी त्याची निर्मिती केली होती. नुकताच सुभाष घई यांनी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणाही केली होती. ज्यामध्ये अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्याऐवजी ते नवीन चेहरे आणणार असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय संजय दत्तसोबत सुभाष घई यांच्या 'खलनायक' या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच पाहायला मिळणार आहेे.












Click it and Unblock the Notifications