Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

CBSE Board: 10 वी, 12 वी निकालाबाबत मोठी अपडेट; पास व्हायला किती मार्क? ग्रेस गुण कसे मिळतील?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) अद्याप इयत्ता १०वी आणि १२ वीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही . गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान झालेल्या परीक्षांसाठी सीबीएसई इयत्ता १०वी आणि १२वीचे निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे यंदाही याच वेळेत हे निकाल जाहीर होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कदाचित, पुढच्या आठवड्यात हे निकाल लागतील.

CBSE 10th-12th result update

कधी झाली परिक्षा?

या वर्षी म्हणजे, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांची इयत्ता दहावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली. तर इयत्ता बारावीची परीक्षा ४ एप्रिल रोजी संपली. या निकालाची अधिकृत घोषणा लवरच करण्यात येणार असून, घोषणा झाल्यावर विद्यार्थी त्यांच्या सीबीएसई २०२५ च्या गुणपत्रिका अधिकृत वेबसाइट्स cbse.gov.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वरून तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

किती विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा?

या वर्षी इयत्ता दहावीच्या २४.१२ लाख विद्यार्थ्यांनी एकूण ८४ विषयांमध्ये परीक्षा दिली. तर एकूण १७.८८ लाख विद्यार्थ्यांनी १२० विषयांमध्ये बारावीची परीक्षा दिली. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेत विद्यार्थ्याचे नाव, विषयानुसार एकूण गुण, सिद्धांत आणि व्यावहारिक गुण, पात्रता स्थिती (उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण) आणि बरेच काही यासारखे महत्त्वाचे तपशील असतील. ऑनलाइन गुणपत्रिका ही तात्पुरती आहे, त्यांनी त्यांच्या संबंधित शाळांमधून मूळ गुणपत्रिका गोळा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कधी लागणार निकाल?

सीबीएसई बोर्डाने गेल्या वर्षी १३ मे रोजी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले होते. तर २०२३ मध्ये १२ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आले होता. गेल्या वर्षी दहावीत एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.६० टक्के होते आणि बारावीत ते ८७.९८ टक्के होते. म्हणजे यावर्षीही त्याच वेळेत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

काय आहे ग्रेस मार्क्स पॉलिसी?

संपूर्ण शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी बोर्ड परीक्षांची रचना केली जाते. एखाद्या विषयात ३३% गुण मिळविल्यानंतर विद्यार्थ्याला उत्तीर्ण घोषित केले जाते. जर एखादा विद्यार्थी पात्रता गुण अगदी कमी प्रमाणात चुकला किंवा १ गुणाने तो अनुत्तीर्ण होत असला, तर बोर्ड त्याच्या विवेकबुद्धीनुसार, विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यास मदत करण्यासाठी ग्रेस मार्क देण्याचा विचार करू शकते.

उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण

(अ) दहावी: उत्तीर्ण घोषित होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात सिद्धांत आणि अंतर्गत मूल्यांकन गुण एकत्रितपणे किमान ३३% गुण मिळवले पाहिजेत.
(ब) इयत्ता १२ वी: पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक/अंतर्गत मूल्यांकन घटकांमध्ये स्वतंत्रपणे किमान ३३% गुण मिळवणे आवश्यक आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+