अकरावी प्रवेशासाठी इनहाउस कोट्याचे नियम बदलले, जाणून घ्या नवे नियम

राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. इनहाउस (Institue-Level/Palak Sanstha) कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असणे बंधनकारक ठरणार आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा नियम लागू करण्यात आला असून, या निर्णयावर संस्थाचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

11th admission 2025

नव्या अटीमुळे इनहाउस प्रवेश कठीण

शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या १०% इनहाउस कोट्याच्या जागा यंदा केवळ त्याच संस्थेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय जर एकाच ठिकाणी, म्हणजेच एकाच संकुलात असतील, तरच उपलब्ध होतील. यापूर्वी असा कोणताही बंधनकारक नियम नव्हता, त्यामुळे अनेक संस्थांच्या शाळांमधून विद्यार्थी त्याच संस्थेच्या इतर भागात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात सहज प्रवेश घेत असत.

संस्थाचालकांचा विरोध; निर्णयावर प्रश्नचिन्ह

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी या नव्या धोरणावर टीका करताना सांगितले की, "इनहाउस म्हणजे संस्थांतर्गत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच ठिकाणी असणे अपेक्षित ठेवणे चुकीचे आहे." त्यांनी हेही नमूद केले की, राज्यभरात अनेक संस्थांमध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालये भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या ठिकाणी असूनही त्या एकाच शिक्षणसंस्थेच्या अंतर्गत येतात. त्यामुळे नव्या नियमामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, असं ते म्हणाले.

एकबोटे यांनी शिक्षण विभागाकडून कोणत्याही भागधारकांशी सल्लामसलत न करता हा निर्णय घेतल्याची टीकाही केली. त्यांनी हे धोरण न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला असून, पालकांनीही आपला विरोध नोंदवावा, असं आवाहन केलं आहे.

शासनाचा खुलासा: नवीन प्रणाली राज्यभर एकसमान

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनलाइन राबवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक व सुसंगत ठेवण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असल्यासच इनहाउस कोटा लागू होईल, हे त्याचाच भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

द्विलक्ष्यी अभ्यासक्रमांचे प्रवेश वेगळ्या पद्धतीने

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांप्रमाणेच काही महाविद्यालयांमध्ये द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. मात्र, या अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावरच होणार आहेत. ऑनलाइन प्रणालीमध्ये ते समाविष्ट केले जाणार नाहीत. महाविद्यालये नियमित प्रवेशाच्या फेऱ्यांनंतरच बायफोकल कोर्ससाठी विद्यार्थी स्वीकारतील.

७५% प्रवेश पूर्ण झाल्यावरच वर्ग सुरू करता येणार

शिक्षण विभागाने यंदा एक स्पष्ट निर्देश जारी केला आहे की, कनिष्ठ महाविद्यालये ७५% प्रवेश पूर्ण झाल्यानंतरच वर्ग सुरू करू शकतात. मात्र, जास्तीत जास्त ११ ऑगस्टपर्यंत सर्व महाविद्यालयांनी शिकवणीस सुरुवात करावी, असे आदेश आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+