RBIने खरेदी केलेले सोनं भारतात कुठे ठेवले जाते, विदेशात ठेवण्याची व्यवस्था काय, जाणून घ्या सर्व काही
RBI Where is gold kept in India : एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. अशातच भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2025 च्या आर्थिक वर्षात 57.5 टन सोने खरेदी केल्याची बातमी समोर आली.
मागील सात वर्षानंतर भारताने एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले. पण हे सोने नेमकं कुठे ठेवले जाते, त्याची सुरक्षा कशी असते, असा प्रश्न देखील आता विचारला जाऊ लागला आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

आरबीआय भारतात सोने कुठे ठेवते?
एवढ्या मोठ्या प्रमाणात आरबीआय सोने खरेदी करते, मग ते ठेवण्याची व्यवस्था कुठे असते, असा प्रश्न तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या मनात साहजिकच येणार आहे. यासाठी आरबीआय सोने ठेवण्यासाठी प्रामुख्याने दोन भागात विभागणी केली आहे.
आरबीआय काही सोने भारतात ठेवते, तर काही सोने विदेशातील बॅंकामध्ये ठेवते. भारतात सोने ठेवण्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर मुंबईतील मिंट रोडवरील आरबीआय इमारतीत आणि नागपूरमधील तिजोरीत सोने ठेवले जाते.
नवीन आकडेवारीनुसार, मार्च 2025 पर्यंत आरबीआयकडे एकूण सोन्याचा साठा 879.6 टनांवर पोहोचला आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत तो 822.1 टन सोन्याचा साठा असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा : RBI Gold Reserve : रिझर्व्ह बँकेने 57.5 टन सोने का खरेदी केले, जाणून घ्या त्यामागील नेमकं कारण!
विदेशात आरबीआय सोने कुठे ठेवते?
देशातील बहुतेक सोन्याचे साठे इंग्लंड आणि इतर परदेशी बँकांमध्ये ठेवलेले आहेत. 2024 च्या पहिल्या तिमाहीत, भारत सर्वात जास्त सोने खरेदी करणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर होता. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यातच भारताने पुन्हा एकदा 57.5 टक्के सोने खरेदी केले आहे.
परदेशात सोने ठेवण्याचे फायदे
जोखीम कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँका अनेक ठिकाणी सोने साठवू इच्छितात. सर्वप्रथम, सुरक्षिततेचा विचार केला जातो. कोणत्याही आपत्तीच्या वेळी भारतातील राजकीय आणि आर्थिक परिस्थिती बिघडली तरी परदेशात ठेवलेले सोने सुरक्षित राहील. अशा परिस्थितीत सोने सुरक्षित ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून, परदेशात राखीव निधी ठेवल्याने आरबीआयला राजकीय धोके टाळण्यास मदत होते.
त्याच वेळी, भूकंप किंवा पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे सोन्याच्या साठ्याचे नुकसान होऊ शकते. परदेशात सोने ठेवल्याने आपत्तींच्या परिस्थितीतही देशात काही सोने सुरक्षित राहण्याची खात्री होते.
याशिवाय, परदेशात सोने ठेवल्याने इतर देशांशी व्यापार करणे सोपे होते. सोन्याचा साठा वाढल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात मदत होते. सोन्याचा वापर इतर देशांकडून कर्ज घेण्यासाठी किंवा आयातीसाठी केला जाऊ शकतो. त्याच वेळी, परदेशात सोन्यावर जास्त व्याज मिळू शकते, ज्याचा भारताला फायदा होतो.












Click it and Unblock the Notifications