Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खाद्यतेलाच्या किमतीत वाढ, शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांना झटका अचानक का वाढले भाव, हे आहे कारण.. वाचा

Rise in Edible Oil Prices : केंद्र सरकारने खाद्यतेलांच्या आयात शुल्कात 20 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामागील मुख्य कारण देशातील शेतकऱ्यांचे हित पाहणे आहे. परदेशातून येणारे खाद्यतेल स्वस्त असल्याने देशातील तेलबिया उत्पादकांना योग्य भाव मिळत नव्हता. आयात शुल्कात वाढ केल्याने परदेशी तेल महाग होणार असून भारतीय शेतकऱ्यांचे सोयाबीन, भुईमूग आणि मोहरी यासारख्या पिकांचे उत्पादन Rise in Edible Oil Prices :आणि विक्री वाढण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय एकीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी असला तरी ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागेल. तरीही, दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहता, देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

Rise in Edible Oil Prices

आयात शुल्कातील वाढीचा शेतकऱ्यांवर परिणाम

देशात सध्या सोयाबीन तेलाची आयात कमी होत असल्यामुळे भारतीय बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मोठी मागणी निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल.

आयात शुल्क वाढल्याने सोयाबीन तेलाचा किलोमागे दर 110 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत गेला आहे. सूर्यफूल तेलाचा दर 115 वरून 130 रुपयांपर्यंत वाढला आहे. या निर्णयामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल, तसेच सोयाबीन आणि मोहरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होईल.

ग्राहकांना महागाईचा झटका

आयात शुल्क वाढल्याने खाद्यतेलाच्या किमतींमध्ये सरासरी 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना खाद्यतेल खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. पण दुसरीकडे, देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळणार आहे.

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा

सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना 100 ते 200 रुपयांपर्यंत वाढलेल्या दरात विक्री करता येणार आहे. नवीन हंगामातील सोयाबीन आता 4700 ते 5000 रुपयांच्या दरम्यान दर आहे. पण, शेतीचा वाढता खर्च बघता हा दरही न परवडणारा आहे. सात ते आठ हजार रूपये दर हवा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

निर्यातीतही बदल

दुसरीकडे बासमती तांदळावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णयही घेतला गेला आहे. यामुळे बासमती तांदळाच्या उत्पादनात वाढ होईल आणि त्याचे शेतकऱ्यांना अधिक भाव मिळेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+