Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अर्थसंकल्पात काय? कसं असेल बजेट, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 तास आधीच सांगून टाकलं!

नवी दिल्ली - आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. आज अधिवेशनापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. त्यात देशवासीयांना संबोधताना त्यांनी सामान्य माणसाला बळ कसे मिळेल आणि देश २०२४७ पर्यंत विकसीत कसा होईल हे सांगितले. त्यातच उद्या सादर होणारे अर्थसंकल्पावरही ते बोलले.

अर्थसंकल्पीय सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. भारत जगात गतीने अर्थव्यवस्थेत पुढे जाणारा देश ठरला असून आपण आता विकासाच्या मार्गावर पुढे आहोत.

PM Narendra Modi Nirmala Sitharaman Budget 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मच्या कार्यकाळात उद्या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प कसा असेल यावर पंतप्रधानांनी भाष्य केले.

2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उद्या अर्थसंकल्प सादर होत असून त्यात 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल, या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. आगामी पाच वर्षे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अर्थसंकल्पात विकसित भारतावर देणार भर देणार आहोत.

वचन पुर्ण करण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं की, उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात देशवासीयांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. देशाच्या अमृत काळातील हा महत्त्वाचे अर्थसंकल्प असून आगामी पाच वर्षांची दिशा या अर्थसंकल्पात मांडली जाईल.

सक्षम अर्थसंकल्प असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंही म्हटलं आहे की, उद्या सादर होणारा अर्थसंकल्प भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठीचा आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत. देशाच्या अर्थव्यवस्थेत संदर्भात बोलताना पंतप्रधान यांनी सांगितलं की. भारताचा विकासदर आठ टक्के असून यामध्ये अजून वाढ होत आहे .

मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल?

निर्मला सीतारामन उद्या आपल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची शक्यता आहे. आयकारात सूट, स्लॅबमध्ये बदल यावर त्या फोकस करू शकतात. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्या दिलासा देण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+