शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेत सरकारचा जमीनीच्या अटीसंदर्भात नवा 'गेमचेंजर' नियम! वाचा
PM Kisan Yojana New Rules marathi : केंद्र सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर असून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्याचाच एक भाग म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेसाठी केवायसी करणे क्रमप्राप्त असतानाच सरकारने एक मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट लाभ देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा बदल केला आहे. २१ व्या हप्त्यापूर्वी करण्यात आलेल्या या बदलामुळे, विशेषत: सीमावर्ती आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना आपत्तकालीन स्थितीत संकटाचा सामना करण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून हा सन्मान निधी दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांना मोठी नाही पण सन्मानजनक मदत मिळते. राज्य सरकारही या योजनेतून शेतकऱ्यांना निधीचे वितरण करते.

जमीन कागदपत्रे नसली तरी मिळणार फायदा!
योजनेत करण्यात आलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे आता काही विशिष्ट शेतकऱ्यांसाठी जमिनीचे दस्तावेज असणे अनिवार्य राहणार नाही.
काय आहे नियम?
- ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचे कागदपत्रे (उदा. सातबारा) उपलब्ध नाहीत, त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- यासाठी राज्य सरकारने (State Government) पुष्टी करणे आवश्यक आहे की, संबंधित शेतकरी प्रत्यक्षात शेती करतो.
- राज्य सरकारने असे प्रमाणपत्र दिल्यास, तो शेतकरी या योजनेचा लाभार्थी बनेल आणि त्याला दरवर्षी ₹६०००/- चे हप्ते मिळत राहतील.
- विशेषतः सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना या बदलामुळे मोठा फायदा होणार आहे.
२१ वा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार!
PM किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ₹२०००/- चा हप्ता जमा करू शकते.
सरकारने पूरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची योजना आखली आहे. अहवालानुसार, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील शेतकऱ्यांना सर्वात आधी या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
'ई-केवायसी' (e-KYC) करणे बंधनकारक!
सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. ई-केवायसी न केल्यास, २१ व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.












Click it and Unblock the Notifications