देशातील 15 बँका बंद! तुमच्या पैशांचं काय होणार? 1 मे पासून कोणते बदल होणार जाणून घ्या
One State One RRB 15 banks closed : देशातील पंधरा बँका आणि त्यांचे कामकाज आजपासून बंद झाले आहे. एक मेपासून आता काय बदल होणार याचीच चिंता सर्वांना आहे आणि या बँकातील पैशांचे काय होणार हेही अनेकांना माहित नाही. त्यामुळे अनेकजणांना अनेक प्रश्न पडले आहेत.
देशातील 15 ग्रामीण बँका बंद होणार आहेत, त्याजागी एक राज्य एक बँक असणार आहे. हा मोठा बदल 1 मे पासून लागू होणार आहे. देशात क्षेत्रीय ग्रामीण बँक अर्थात आरआरबी लागू होणार आहे. ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण होणार असून हा एकत्रीकरणाचा चौथा टप्पा आहे. त्यामुळे आता एक मे पासून 43 ग्रामीण बँका घटून हा आकडा 28 वर येणार आहे.

तुमच्या पैशांचे काय होणार?
आता पंधरा बँका बंद करण्याच्या निर्णयानंतर सरकारने ग्राहकांना डिजिटल आणि ग्राहक सेवा उच्चप्रतिची देत आहे. त्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, यासह ज्यांचे पैसे या बँक खात्यात आहेत, तरीही चिंता नाही या बँका बंद होत असल्या तरीही ग्राहकांचे पैसे कुठेही जाणार नाहीत.
फक्त बँकेचे नाव बदलेल पैसे सुरक्षितच
पंधरा बँका राज्य स्तरावरील एकाच बँकेत विलिन होणार आहेत त्यामुळे फक्त तुमच्या बँकेचे नाव बदलणार आहे, तुमचे खात्यात तेवढीच शिल्लक रक्कम राहील जी आधी आहे. यासह कर्ज आणि इतर गोष्टीही तशाच राहतील. आधी जशा सुविधा होत्या त्या तशाच राहतील.
फक्त खातेक्रमांक, चेकबूक आणि पासबूक बदलणार
जर बंद होणाऱ्या बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला बँकेकडून एक संदेश येईल ज्यात तुमचा नवीन खातेक्रमांक काय आहे ते कळवले जाईल. म्हणजेच खाते क्रमांक बदलेल. त्यासह नवीन चेकबूक आणि पासबूक आपल्याला मिळणार आहे.
महाराष्ट्रासह 11 राज्यात एकत्रीकरण
वित्त मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसुचना काढली आहे. त्यानुसार, अकरा राज्यातील ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश,राजस्थान आणि ओडीसा या राज्यातील सध्याच्या ग्रामीण बँकांचे विलिनीकरण होणार आहे.
एक मे पासून ग्रामीण बँकांची संख्या अठ्ठावीस होणार असून विलिनीकरणानंतर या सर्व बँका एकत्र काम करतील. क्षेत्रीय बँक अधिनियम 1976 कलम 23 ए (1) नुसार, देण्यात आलेल्या अधिकाराच्या अनुसार विलिनीकरण प्रक्रीया पार पडणार आहे.
कोण कोणत्या ग्रामीण बँका होणार विलीन?
कॅनरा बँक, इंडियन बँक, भारतीय स्टेट बँक आणि युनीयन बँक ऑफ इंडियाद्वारे प्रायोजित असलेल्या चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक, आंध्र प्रगती ग्रामीण बँक, सप्तगिरी ग्रामीण बँक, आंध्रप्रदेश ग्रामीण विकास बँक, आंध्रप्रदेश ग्रामीण बँकेच्या रुपात विलिन केले जाईल.












Click it and Unblock the Notifications