फायद्याची बातमी! फक्त 5 हजारांत सुरू करा स्वतःचा व्यवसाय! सरकार देणार मदत, दरमहा भरघोस कमाई
Jan Aushadhi kendra start business 5000 govt incentive earning : जर तुम्ही कमी पैशात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. गुंतवणुकीच्या भीतीमुळे अनेक लोक व्यवसाय सुरू करण्याचा विचार सोडून देतात. मात्र, आता फक्त ५,००० रुपये इतक्या कमी नोंदणी शुल्कात तुम्ही 'प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र' (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Kendra) सुरू करू शकता. विशेष म्हणजे, या व्यवसायासाठी सरकारकडून मोठी मदत आणि प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे दरमहा चांगली कमाई करणे शक्य आहे.
'जनऔषधी केंद्र' सुरू करण्याची काही सोपस्कार आणि पात्रता आहेत, त्या जर तुम्ही पुर्ण करत असाल तर 'या' व्यवसायात मोठा लाभ मिळतो शिवाय सरकारी योजनेतून फायदे आणि कमाईचे मार्गही आहेत.

जनऔषधी केंद्र म्हणजे काय?
हे केंद्र देशभरातील नागरिकांना ५०% ते ९०% पर्यंत स्वस्त दरात चांगल्या प्रतीची औषधे उपलब्ध करून देते. औषधांची वाढती मागणी पाहता, आता केंद्र सरकार नवीन केंद्र उघडण्यासाठी पात्र व्यक्तींना प्रोत्साहन देत आहे.
'या' व्यवसायाचे फायदे आणि कमाईचे मार्ग
- अत्यंत कमी गुंतवणूक: केवळ ५,००० रुपये अर्ज शुल्क भरून तुम्ही व्यवसायाची नोंदणी करू शकता.
- दवा विक्रीवर २०% कमीशन: तुम्ही विक्री केलेल्या औषधांवर तुम्हाला २०% पर्यंत कमिशन मिळते.
- सरकारी प्रोत्साहन : सरकार दर महिन्याला ५ लाख रुपयांपर्यंतच्या विक्रीवर १५% प्रोत्साहन रक्कम (इन्सेंटिव्ह) देते. याचा अर्थ मोठी कमाई करण्याची संधी आहे.
- सेटअपसाठी आर्थिक मदत : दुकान सेटअप करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.
- विशेष लाभ: महिला उद्योजिका, दिव्यांग व्यक्ती किंवा डोंगराळ भागातील अर्जदारांना एकरकमी २ लाख रुपयांची अतिरिक्त मदत देखील मिळते.
पात्रता आणि आवश्यक गोष्टी
जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी खालील मूलभूत पात्रता असणे आवश्यक आहे.
पात्रता, शिक्षण : अर्जदाराकडे 'डी-फार्म' किंवा 'बी-फार्म'चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
जागा : दुकान चालवण्यासाठी किमान १२० चौरस फूट जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे.
नियुक्ती : जर तुमच्याकडे स्वतःचे फार्मासिस्ट लायसन्स नसेल, तर तुम्ही अधिकृत फार्मासिस्टची नियुक्ती करू शकता.
अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
जनऔषधी केंद्र सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे.
सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट janaushadhi.gov.in वर जा.अर्ज करा.
"Apply for Kendra" (केंद्रसाठी अर्ज करा) हा पर्याय निवडा.
मोबाईल नंबर आणि OTP वापरून नोंदणी करा.
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
लॉगिन करून अंतिम अर्ज सादर करा.
पडताळणी आणि तपासणीनंतर तुम्हाला केंद्र उघडण्याची परवानगी दिली जाईल.
कमी खर्च, सरकारी मदत आणि निश्चित कमिशनमुळे जनऔषधी केंद्र सुरू करणे हा स्थायी आणि सुरक्षित उत्पन्नाचा उत्तम मार्ग आहे.












Click it and Unblock the Notifications