India's Export Jumps: झंडा ऊंचा रहे हमारा! US टॅरीफ पाॅलिसी फेल, आव्हानं पेलून भारताची निर्यातीत झेप
India's Export Jumps 19 in Nov US Remains Top Buyer : "अमेरिकेची कडक टॅरिफ धोरणे आणि जागतिक बाजारपेठेतील आव्हानांना पछाडत भारतीय निर्यातीने नोव्हेंबर महिन्यात १९ टक्क्यांची ऐतिहासिक झेप घेतली आहे! सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही भारतीय इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी जागतिक स्तरावर आपला दबदबा कायम राखला आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेने कर वाढवूनही भारताकडून ७ अब्ज डॉलर्सची विक्रमी खरेदी केली असून, चीननेही आता भारताच्या टॉप-३ खरेदीदारांच्या यादीत एन्ट्री केली आहे. व्यापार तूट घटल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा 'सुपर संडे' सारखा निकाल समोर आला आहे."

निर्यातीत १९ टक्क्यांची विक्रमी वाढ
ऑक्टोबर महिन्यात निर्यातीवर काहीसा दबाव दिसून आला होता, मात्र नोव्हेंबरमध्ये भारतीय निर्यातीने जोरदार उसळी घेतली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत निर्यातीत १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. विदेशी बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची विश्वासार्हता वाढत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
अमेरिकेची मोठी खरेदी; टॅरिफ धोरण ठरले निष्प्रभ
अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर कर वाढवूनही, नोव्हेंबर महिन्यात भारताकडून तब्बल ७ अब्ज डॉलर्सचा माल खरेदी केला आहे. यात प्रामुख्याने इंजिनिअरिंग गुड्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश आहे. अमेरिकेच्या खरेदीमुळे भारताच्या निर्यातीला मजबूत आधार मिळाला असून अमेरिकेची टॅरिफ पॉलिसी भारतीय मालाची मागणी रोखण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे.
चीनकडूनही खरेदीत वाढ; टॉप-३ मध्ये स्थान
भारताच्या व्यापार क्षेत्रासाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे चीननेही भारताकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. नोव्हेंबरमध्ये चीनने भारताकडून २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त माल आयात केला. या वाढीमुळे चीन आता भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यात बाजार बनला आहे. निर्यातीच्या बाबतीत अमेरिका पहिल्या, युएई दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे.
आयात घटल्याने व्यापार तूट कमी
निर्यातीत वाढ होत असतानाच भारताच्या आयातीत मात्र घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण आयात ६२ अब्ज डॉलर्स राहिली. सोन्याच्या आयातीत मोठी कपात झाल्यामुळे आयात बिल कमी झाले असून व्यापार तूट (Trade Deficit) आता २४.६ अब्ज डॉलर्सवर आली आहे. गेल्या काही महिन्यांतील हा नीचांकी स्तर आहे.
आर्थिक संकेतांमुळे दिलासा
जागतिक आव्हानांना तोंड देत भारताने निर्यातीत मिळवलेले हे यश भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत सकारात्मक मानले जात आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही निर्यातीचा हा वेग कायम राहणे, हे येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेला बळ देणारे ठरेल.












Click it and Unblock the Notifications