Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अनंत अंबानीने दुप्पट पैसे देऊन 250 कोंबड्यांचे वाचवले प्राण, या कोंबड्याचं पुढे काय करणार,घ्या जाणून

Anant Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा त्याच्या परोपकारी कामांमुळे आणि प्राण्यांवरील प्रेमामुळे अनेकदा चर्चेत असतो. यावेळीही अनंतने असे काही केले आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. जामनगर ते द्वारका या 140 किमीच्या पायी पदयात्रेच्या प्रवासादरम्यान अनंतने 250 कोंबड्यांचे प्राण वाचवून एक आदर्श घालून दिला आहे.

पदयात्रेदरम्यान अनंत अंबानी यांना एक ट्रक दिसला ज्यामध्ये 250 कोंबड्या विक्रीसाठी नेल्या जात होत्या. हे दृश्य पाहून त्याने ताबडतोब ट्रक थांबवला आणि दुप्पट किंमत देऊन त्या कोंबड्या विकत घेत त्यांचे प्राण वाचवले आहेत. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

anant ambani

अनंत अंबानींनी स्वतः सांगितले या कोंबड्याचं काय करणार?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी हातात कोंबडी घेऊन चालताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी 'जय द्वारकाधीश'चा नाराही दिला. त्याने या सर्व कोंबड्यांना त्याच्या वन्यजीव संवर्धन केंद्र "वंतारा" मध्ये पाठवल्य आहेत, जिथे आता त्यांची योग्य काळजी घेतली जाईल. अनंत यांनी स्वतः सांगितले की आता आपण त्या सर्वांना (कोंबड्या) वाढवू आणि त्यांची काळजी घेऊ.

अनंत अंबानी यांची पदयात्रा

अनंत अंबानी यांनी भेटीच्या पाचव्या दिवशी वडत्रा गावात असलेल्या विश्वनाथ वेद संस्कृत शाळेत पोहोचले, जिथे त्यांनी संस्थापक मगनभाई राज्यगुरू यांचे चरणस्पर्श केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर खांभालिया येथील फुलिया हनुमान मंदिरात, भरतदास बापूंनी त्यांना पुष्पहार घालून आणि भगवान द्वारकाधीशांचे चित्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

10 एप्रिल रोजी द्वारकेत वाढदिवस साजरा करणार

अनंत अंबानी यांनी 28 मार्च रोजी जामनगरमधील मोती खावडी येथून आपला प्रवास सुरू केला आहे. ते दररोज 10-12 किलोमीटर प्रवास करत आहेत. 10 एप्रिल रोजी द्वारका येथे त्यांचा 30 वा वाढदिवस साजरा करतील. या काळात ते प्रमुख मंदिरांना भेट देत आहेत आणि भगवान द्वारकाधीशांचे आशीर्वाद घेत आहेत.

वन्यजीव संवर्धनासाठी समर्पित

अनंत अंबानी केवळ कोंबड्यांसाठीच नाही तर इतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी देखील पूर्णपणे समर्पित आहेत. त्यांच्या "वंतारा" या वन्यजीव संवर्धन प्रकल्पाने आतापर्यंत दीड लाखाहून अधिक प्राण्यांचे प्राण वाचवले आहेत. अलिकडेच केंद्र सरकारने त्यांना प्राणी कल्याणासाठी "प्राणि मित्र राष्ट्रीय पुरस्कार" देऊन सन्मानित केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+