Aaj che rashi bhavishya 'या' राशीवाल्यांना नोकरीत बढती, तर कुणाला आर्थिक चणचण?; वाचा आजचे राशीभविष्य
Aaj che rashi bhavishya marathi 29 october 2025 : आज, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्र मकर राशीत स्थित आहे. मकर राशीतील चंद्राचे भ्रमण काही राशींसाठी व्यवसायात लाभ, नोकरीत बढती आणि आनंदी क्षण घेऊन आले आहे, तर काही राशींना खर्च, मानसिक ताण आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. द्विधा मनःस्थिती आणि वादांपासून दूर राहिल्यास दिवस कसा जाईल, याबद्दलचे ज्योतिषीय संकेत दिले आहेत.

मेष
आजचा दिवस आनंददायी राहील. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास घडेल, ज्यात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढतीचे योग आहेत. मात्र, कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल.
वृषभ
व्यापारासाठी शुभ दिवस. नवीन योजना हाती घेऊ शकता आणि आर्थिक लाभ प्राप्त होतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे.
कर्क
आजचा पूर्ण दिवस उत्साह आणि मनोरंजनात जाईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल आणि वाहन सौख्य लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतो.
वृश्चिक
नवीन कार्यारंभास अनुकूल दिवस. भावंडांशी महत्त्वाची चर्चा होईल. आर्थिक लाभ संभवतो आणि नशिबाची चांगली साथ लाभेल.
मकर
नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मान-सन्मान मिळतील आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.
मीन
प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
या राशींनी 'सावधान' राहावे!
मिथुन
नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे. रागावर संयम ठेवला नाही, तर अप्रिय प्रसंगाला सामोरे जावे लागेल. खर्च जास्त झाल्याने आर्थिक चणचण भासेल.
सिंह
मध्यम फलदायी दिवस. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येऊ शकते.
कन्या
शक्यतो वाद आणि चर्चा यापासून दूर राहा. शेअर्स किंवा सट्टेबाजीत गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात.
तूळ
मानसिक थकवा जाणवेल आणि जास्त हळवे व्हाल. प्रवासासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. कौटुंबिक आणि जमीन-जुमल्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
धनू
द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होण्याची शक्यता आहे. आज महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे.
कुंभ
आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोर्ट-कचेरीपासून दूर राहा आणि आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.












Click it and Unblock the Notifications