Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

युजवेंद्र चहलसाठी काडीमोड अवघड! घटस्फोटानंतर धनश्रीला पोटगी म्हणून किती रक्कम द्यावी लागणार? वाचा

Yuzvendra Chahal Dhanashree Verma divorce : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल सध्या खूपच चर्चेत आहे त्याला महत्वाचे कारण म्हणजे पत्नी धनश्रीसोबतचा त्याचा कथित घटस्फोट...सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. जर दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र चहलला धनश्रीला किती पैसे द्यावे लागतील याचा अंदाज लावले जात आहेत. एका रिपोर्टनुसार, धनश्रीला दोन पाच नव्हे तब्बल 60 कोटी रुपये द्यावे लागतील अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा होत असताना चहलने या अफवांवर दुःख व्यक्त केले आहे. तर धनश्रीने हे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे तसेच लोकांनी या गोष्टीत पडू नये असे आवाहन केले आहे. ही चर्चा इन्स्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफाॅलो करण्यापासून सुरु झाली आणि आता ती घटस्फोटाच्या अंदाजापर्यंत पोहचली आहे.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma divorce

कधी झाले होते दोघांचे लग्न?

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न डिसेंबर 2020 मध्ये गुरुग्राम येथे झाले होते. दोघे एकमेकांना कोरोनाच्या काळात भेटले होते. जेव्हा चहलने डान्स शिकण्यासाठी धनश्रीसाठी संपर्क केला होता पण सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चा पाहता दोघांच्या नात्यात दरी आली असे म्हटले जात आहे.

चहलला धनश्रीला द्यावे लागतील 60 कोटी

अधिकृतरित्या चहल किंवा धनश्री यांच्याकडून त्यांच्या नात्याबद्दल किंवा घटस्फोटाबद्दल काहीही वक्तव्य आलेले नाही पण धनश्रीने निराधार गोष्टी आणि ट्रोलींगबद्दल टीका केली आहे.

या सर्व पार्श्वभुमीवर एक माहिती अशीही येत आहे की, भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-यूट्यूबर धनश्री वर्मा यांचा आता अधिकृत घटस्फोट झाला आहे. वृत्तानुसार या दोघांनी गुरुवारी वांद्रे कुटुंब न्यायालयात कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या.

4 वर्षांचे नाते संपुष्टात

गेल्या 18 महिन्यांपासून हे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. चहल आणि धनश्री वर्मा यांनी आता अधिकृतपणे त्यांचे लग्न संपवले आहे. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते आता पती-पत्नी राहिलेले नाहीत. वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निर्णयानंतर हे नाते कायमचे तुटले आहे. 2020 मध्ये लग्न झालेल्या धनश्री-युजवेंद्र चहल यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, यानंतर हे नाते संपुष्टात आले आहे.

किती वाजता झाली सुनावणी?

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वकिलाने सांगितले की, अंतिम सुनावणीसह कायदेशीर औपचारिकता गुरुवारी सकाळी 11 वाजता सुरू झाल्या. दोन्ही पक्षांनी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचे मान्य केल्यानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. न्यायालयीन सत्रात चहल आणि वर्मा यांच्यासाठी 45 मिनिटे चालणारे अनिवार्य समुपदेशन सत्रही समाविष्ट होते. हे सत्र संपल्यानंतर न्यायाधीशांनी चौकशी केली असता, दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा त्यांचा हेतू असल्याचे मान्य केले. पुढील चौकशीत असे दिसून आले की दोघेही निर्णय घेण्यापूर्वी 18 महिन्यांपासून वेगळे राहत होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+