Year Ender 2025 : टी-20 क्रिकेटमध्ये रनमशीन बनले 'हे' 3 भारतीय खेळाडू, गोलंदाजांनाही रडवले!
Year Ender 2025 Top 3 Indian Batsmen with Most Runs in T20 : "क्रिकेटच्या मैदानावर २०२५ हे वर्ष पूर्णपणे 'टीम इंडिया'च्या नावावर राहिलं! एका बाजूला अनुभवी खेळाडूंचा संयम आणि दुसऱ्या बाजूला युवा रक्ताचा आक्रमकपणा... या जोरावर भारतीय फलंदाजांनी टी-२० फॉरमॅटमध्ये गोलंदाजांचे अक्षरशः धाबे दणाणून सोडले. या वर्षात टीम इंडियासाठी असे तीन 'सुपरहिरो' समोर आले, ज्यांनी केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर प्रतिस्पर्धी संघांना मैदानात पाणी पाजलं. अभिषेक शर्माचा वादळवेगी स्ट्राईक रेट असो किंवा तिलक वर्माचा क्लास, या त्रिकुटाने २०२५ मध्ये भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ लिहिला आहे. नेमकी कशी राहिली या तिघांची कामगिरी? पाहा हा विशेष रिपोर्ट..."

१. अभिषेक शर्मा: भारतीय क्रिकेटचा नवा 'रन मशीन'
२०२५ मध्ये अभिषेक शर्मा भारताचा सर्वात यशस्वी टी-20 फलंदाज ठरला आहे. त्याने २१ सामन्यांत ८५९ धावा कुटल्या, ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या १३५ आहे. ४२.९५ च्या सरासरीने आणि १९३.४६ च्या स्फोटक स्ट्राईक रेटने त्याने गोलंदाजांची धुलाई केली. १ शतक आणि ५ अर्धशतकांसह तो आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.
२. तिलक वर्मा: मधल्या फळीतील सर्वात विश्वासार्ह फलंदाज
तिलक वर्माने २०२५ मध्ये स्वत:ला मधल्या फळीतील हुकमी एक्का म्हणून सिद्ध केले आहे. २० सामन्यांत त्याने ५६७ धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याचा ४७.२५ चा सरासरी दर या यादीत सर्वोत्तम आहे. कठीण प्रसंगात टीम इंडियाचा डाव सावरणारा आणि गरज पडल्यास फटकेबाजी करणारा तिलक हा २०२५ चा महत्त्वाचा खेळाडू ठरला.
३. हार्दिक पांड्या: पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका यशस्वी
अनुभवी अष्टपैलू हार्दिक पांड्याने २०२५ मध्ये १५ सामन्यांत ३०२ धावा केल्या. १५३.२९ च्या स्ट्राईक रेटने त्याने खालच्या फळीत येऊन अनेक सामन्यांचे निकाल बदलले. ३ अर्धशतकांसह त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो जगातील सर्वोत्तम मॅच फिनिशरपैकी एक का आहे.












Click it and Unblock the Notifications