Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

यशस्वी जयस्वालने मारली अजिंक्य राहणेच्या किटला लाथ; यशस्वीला कशाचा गर्व झालाय? काय आहे वाद? वाचा...

अजिंक्य राहणे या संगमनेरच्या खेळाडूचे महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात चाहते आहेत. आपल्या शांत स्वभावामुळे तो सर्वांनाच आवडतो. अजिंक्य सध्या टीम इंडियाचा भाग नसला तरी संघातील अनेक खेळाडू त्याचा आदर करतात. कुणी तर त्याला ज्युनिअर राहुल द्रविडही म्हणतं. अजिंक्य राहणेच्या नेतृत्त्वाखील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमित पराभव केला होता. मात्र याच अजिंक्य राहणेचे आणि यशस्वी जयस्वालचे मोठे वाद आहेत, अशाही चर्चा आहेत.

Ajinkya Rahane - Yashasvi Jaiswal controversy

किटला खरंच लाथ मारली का?

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अजिंक्य राहणे व यशस्वी जयस्वाल हे दोघेही रणजी खेळत होते. त्यावेळी यशस्वी जयस्वालने एकदा रागात अजिंक्य राहणेच्या किटला लाथ मारली होती. यशस्वी व अजिंक्यचा वाद हा फार पूर्वीपासून आहे. जेव्हा अजिंक्य राहणे हा मुंबई रणजी संघाचे नेतृत्व करत होता, तेव्हापासून या दोघांचे वाजले आहे. मात्र या दोघांमधला वाद दिवसेंदिवस वाढतच गेला.

जयस्वालने सोडला संघ

अजिंक्य राहणे हा मुंबई रणजी संघाचे नेतृत्व करतो. यशस्वीही आत्तापर्यंत मुंबई संघाकडूनच खेळला आहे. मात्र आयपीएल २०२५ मध्ये त्याने आपण गोवा संघाकडून खेळणार असल्याचे जाहीर केले. यशस्वीने मुंबई संघ का सोडला याच्या चर्चा सुरु झाल्या. काहींच्या मते गोवा संघाचे कर्णधारपद यशस्वी दिले जाणार असल्याने त्याने मुंबई संघ सोडला. तर काहींच्या मते यशस्वी हा अजिंक्य राहणेच्या नेतृत्त्वाखाली खेळणार नसल्याने त्याने मुंबई संघ सोडला असावा.

नेमका काय आहे वाद?

ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळण्याचे आदेश दिले होते. जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा खेळले. या सामन्यात जम्मू आणि काश्मीरने ऐतिहासिक विजय मिळवला. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक साळवी यांनी पराभवासाठी यशस्वी जयस्वालला जबाबदार धरले होते. रणजी ट्रॉफी सामन्यात जयस्वाल विरोधी संघातील एका खेळाडूला स्लेजिंग करत होता. ज्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणे खूश नव्हता आणि त्याने जयस्वालला मैदान सोडण्यास सांगितले होते. तेव्हापासून या दोघांत वाद सुरु झाला.

यशस्वी गोव्याकडून खेळणार

देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वालने संघ बदलला आहे. कर्णधारपदाची महत्त्वाकांक्षा हे त्याचे एक कारण सांगितले जात असले तरी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेसोबतच्या मतभेदामुळे त्याला संघ बदलावे लागला असेही सांगितले जात आहे. यशस्वी जयस्वाल आता गोव्याकडून खेळताना दिसणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+