मोठी बातमी! विराट कोहलीच्या RCB मध्ये अनुष्का खेळणार नाही? WPL मध्ये गुजरात संघाकडून खेळणार
WPL 2026 Anushka Sharma Sold to Gujarat Giants : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या लिलावात खेळाडूंच्या किमती, विक्रम आणि संघ निवड यापेक्षाही एक 'रोचक ट्विस्ट' पाहायला मिळाला! रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि गुजरात जायंट्समध्ये एका युवा खेळाडूला घेण्यासाठी जोरदार चढाओढ झाली. ही चढाओढ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्या खेळाडूचे नाव! अनुष्का शर्मा..होय अनुष्का शर्माच जी आता विराट कोहलीच्या आरसीबीऐवजी गुजरात जायंट्सकडून खेळणार आहे.

लिलावात रंगली अनुष्का शर्माची 'बिडिंग वॉर'
तुम्ही थोडे चकीत व्हाल पण ही खेळाडू नक्कीच अनुष्का शर्माच आहे, क्रिकेटचा बादशाह विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या नावासारखीच ती खेळाडू होती. अखेर, चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली नाही, कारण ही अनुष्का आरसीबीऐवजी दुसऱ्याच संघात गेली!
नाव ठरले आकर्षणाचे केंद्र
दिल्लीत पार पडलेल्या WPL २०२६ च्या लिलावात, मध्य प्रदेशची अष्टपैलू खेळाडू अनुष्का शर्मा हिच्यासाठी जोरदार बोली लागली. या खेळाडूचे नाव बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (विराट कोहलीची पत्नी) यांच्याशी मिळते-जुळते असल्याने, सोशल मीडियावर तिची चर्चा लगेच सुरू झाली.
RCB ची तीव्र इच्छा
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) ने या खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी तीव्र इच्छा दाखवली. आरसीबीने अनुष्कासाठी सलग बोली लावल्याने, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नावातील सार्धम्यामुळे ही खेळाडूही त्याच फ्रँचायझीमध्ये येईल की काय, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली. परंतु, अखेरीस बाजी मारली ती गुजरात जायंट्सने! त्यांनी ४५ लाख रुपयांची मोठी बोली लावत या युवा अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात सामील केले. त्यामुळे, चाहत्यांना आता अभिनेत्री अनुष्का शर्मा स्टेडियमवर आपल्या पतीसाठी (विराट कोहली) चीअर करताना दिसेल, पण खेळाडू अनुष्का शर्मा मात्र गुजरातच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे!
कोण आहे ही 'अनुष्का शर्मा'?
२२ वर्षीय अनुष्का शर्मा ही मुळ मध्य प्रदेशची रहिवासी आहे. ती घरगुती क्रिकेटमध्ये नियमितपणे खेळते. लिलावापूर्वी तिने सेंट्रल झोन महिला संघाकडून खेळताना ८० धावांची शानदार खेळी केली होती, ज्यामुळे फ्रँचायझींचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. ती उजव्या हाताची ऑफ-ब्रेक गोलंदाज आहे आणि उत्तम फलंदाजही आहे. यंदाच्या सीनियर महिला T20 ट्रॉफीमध्ये तिने मध्य प्रदेशसाठी २०७ धावा केल्या होत्या.
बेस प्राईस किती?
अनुष्का शर्माची मूळ किंमत फक्त १० लाख रुपये होती, पण आरसीबी आणि गुजरात जायंट्समधील चढाओढीमुळे तिला मूळ किमतीच्या साडेचारपट म्हणजेच ४५ लाख रुपये मिळाले.












Click it and Unblock the Notifications