Womens t20 World cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंचा समावेश
Womens t20 World cup 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसी महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या 15 सदस्यीय टीमचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर सांगलीच्या स्मृती मंधानाची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
दुखापतग्रस्त असूनही श्रेयंका पाटील आणि यष्टीकीपर फलंदाज यास्तिका भाटिया यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दोघी वेळेवर ब-या झाल्या तर संघात राहील, अन्यथा त्यांच्या जागी आणखी कोणाचा तरी समावेश केला जाईल.

पहिला सामना कधी होणार?
या स्पर्धेसाठी निवड समितीने तीन राखीव खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. महिला टी-20 विश्वचषक 2024 युएईमध्ये 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाचा 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना असणार आहे, तर त्यांचा दुसरा सामना, पाकिस्तान विरुद्धचा सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे.
9 ऑक्टोबरला श्रीलंकेशी सामना
यानंतर 9 ऑक्टोबरला भारताचा श्रीलंकेशी आणि 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी सामना होईल. उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबरला होणार आहेत, तर अंतिम सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे. श्रेयंका पाटील आणि यस्तिका भाटिया यांचा टीममधील समावेश दुखापतीतून बरा होण्यावर अबलंबून आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या तारखेपासून त्यांच्या फिटनेसचे मूल्यांकन केले जाईल. जर त्या तंदुरुस्त नसतील तर त्यांच्या जागी दुस-या खेळाडू घेतले जातील.
भारतीय संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आव्हानात्मक सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनासारख्या अनुभवी खेळाडूंच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडून दमदार कामगिरीच्या मोठ्या अपेक्षा आहेत. टीमच्या तयारीमध्ये कठोर ट्रेनिंग सेशन्सचा समावेश आहे
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय टीम
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकिपर), यास्तिका भाटिया (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालयन, हेमलतान शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना सजीवन.
राखीव : राघवी बिस्त, प्रिया मिश्रा












Click it and Unblock the Notifications